सार
Platform ticket validity: प्लॅटफॉर्म तिकीट काढल्यानंतर आपण किती वेळ रेल्वे स्थानकात थांबू शकतो? असा प्रश्न बहुतांशजणांना पडतो. तिकीट काढल्यानंतर ती व्यवस्थितीत पाहिल्यास त्यावर वैधतेबद्दलची माहिती दिलेली असते.
Platform ticket: बहुतांश लोक ट्रेनच्या माध्यमातून प्रवास करतात. काहीजण प्लॅटफॉर्मवर आपल्या नातेवाईकांना सोडण्यासाठी येतात. त्यावेळी प्लॅटफॉर्म तिकीट काढावी लागते. पण तुम्हाला माहितेय का, प्लॅटफॉर्म तिकिटाची वैधता किती वेळ असते? अथवा वैधतेपेक्षा अधिक वेळ थांबल्या दंडात्मक कारवाई केली जाते का? याच बद्दल जाणून घेऊया सविस्तर...
तुम्ही एखाद्याला रेल्वे स्थानकात सोडण्यासाठी जात आहात. त्यावेळी सर्वप्रथम प्लॅटफॉर्म तिकीट काढावी लागेल. सध्या प्लॅटफॉर्म तिकीट ऑनलाईन पद्धतीनेही काढता येते. ऑनलाईन तिकीट काढण्यासाठी तुम्हाला भारतीय रेल्वेचा युटीएस अॅप (UTS App) डाउनलोड करावा लागेल.
अॅप डाउलोड केल्यानंतर तेथे रजिस्ट्रेशन केल्यानंतर प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंगच्या सेक्शनमध्ये स्टेशनचे नाव निवडून तिकीट काढू शकता. या तिकिटावर स्टेशनचे नाव, वैधता आणि कोणत्या वेळेला तिकीट काढले आहे अशी सर्व माहिती दिसेल. सर्वसामान्यपणे मोठ्या रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म तिकीट 2 तासांसाठी वैध असते. याशिवाय प्लॅटफॉर्म तिकीट ऑनलाईन काढल्यानंतर ती रद्द करू शकत नाही.
ट्रेन उशिराने धावत असल्यास
ट्रेन उशिराने धावत असेल आणि तुम्ही आधीच प्लॅटफॉर्म तिकीट काढले तर रेल्वे स्थानकात पोहोचल्यानंतर वैध राहणार नाही. यामुळे प्लॅटफॉर्म तिकिटाची वैधता दोन तासांची असली तरीही ती काढण्यापूर्वी ट्रेनचे लाइव्ह स्टेटस (Train Live Status) पाहून काढावी. जेणेकरून ज्यावेळी तुम्ही प्लॅटफॉर्म तिकिटावर एखाद्याला सोडण्यासाठी अथवा घेण्यासाठी जाता तेव्हा त्याच्या वैधतेचा फायदा होईल. (Platfrom ticket niyam kay aahe)
दोन तासांपेक्षा अधिक वेळ थांबल्यास
प्लॅटफॉर्म तिकीट काढल्यानंतर दोन तास रेल्वे स्थानकात थांबण्याची परवानगी असते. मात्र दोन तासांपेक्षा अधिक वेळ रेल्वे स्थानकात थांबल्यास स्थानकातून बाहेर पडताना त्याला तिकीट कलेक्टरने (Ticket Collector) अडवल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते. या दंडात्मक कारवाईसह व्यक्तीला जवळच्या स्थानकापर्यंतच्या तिकिटाचे भाडे देखील द्यावे लागते.
प्लॅटफॉर्म तिकिटावर प्रवास करू शकतो?
भारतीय रेल्वेच्या नियमानुसार, तुमच्याकडे रिजर्व्हेशन तिकीट नसल्यास आणि तुम्हाला ट्रेनच्या माध्यमातून प्रवास करायचा असल्यास प्लॅटफॉर्म तिकिटावर करू शकता. म्हणजेच तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करून प्रवास करू शकता. यासाठी प्रवास तिकीट परीक्षकाकडे (TTE) जाऊन ज्या ठिकाणी जायचे आहे तेथील तिकीट काढावे लागेल. जेणेकरून तुम्ही तिकीट काढून प्रवास करत आहात हे तिकीट कलेक्टरने अडणवूक केल्यास दाखवता येईल.
आणखी वाचा:
श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी 3 हजार VVIPना आमंत्रण, यादीत आहेत ही मोठी नावं