या न्यायाधीशांनी कलम 370 वर सुनावला ऐतिहासिक निर्णय
सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 ला आव्हान देणाऱ्या याचिकांवर ऐतिहासिक निर्णय सुनावला आहे.
संविधानातील कलम 1 व 370 वरून स्पष्ट होते की, जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. यामुळे संविधानातील सर्व तरतूदी येथे लागू होऊ शकतात.
केंद्र सरकारने 5 ऑगस्ट, 2019 रोजी जम्मू-काश्मीर मधून कलम 370 हटवला होता. कलम 370 वर निर्णय सुनावणाऱ्या न्यायमूर्तींबद्दल जाणून घेऊया…
सरन्यायाधीश डी.व्हाय. चंद्रचूड यांचा जन्म 11 नोव्हेंबर,1959 रोजी झाला आहे. त्याचे वडील व्हाय. वी. चंद्रचूडही सरन्यायाधीश होते.
संजय कौल यांना 17 फेब्रुवारी 2017 रोजी सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याच्या अभ्यासात पदवी संपादन केली आहे.
न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याच्या अभ्यासक्रमात पदवी मिळवली आहे. खन्ना यांची 18 जानेवारी, 2019 रोजी SC मध्ये न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली.
न्यायमूर्ती बी.आर. गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी झाला होता. न्यायमूर्ती केजी बालकृष्णन यांच्यानंतर गवई हे दुसरे दलित न्यायमूर्ती आहेत.
न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा जन्म 10 फेब्रुवारी, 1962 रोजी हिसारमध्ये झाला होता. सूर्यकांत यांनी 1984 मध्ये महर्षी दयानंद विद्यापीठ रोहतक येथून कायद्याच्या अभ्यासात पदवी मिळवली आहे.