हल्ली जीममध्ये असताना हृदयविकाराचा झटका येणे झाले सामान्य, व्यायाम करताना काही चुकतंय का?

| Published : Mar 29 2024, 12:00 PM IST / Updated: Mar 29 2024, 12:22 PM IST

gym

सार

अलीकडच्या काळात लोकांना जीममध्ये असताना हृदयविकाराचा झटका येणे सामान्य झाले आहे.

अलीकडच्या काळात लोकांना जीममध्ये असताना हृदयविकाराचा झटका येणे सामान्य झाले आहे. जीममध्ये लोक तब्येत तंदुरुस्त ठेवण्यासाठी जातात पण हल्ली जीममध्ये गेल्यानंतर अनेकांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे हे नेमकं काय होत आहे, हे लोकांच्या लक्षात येत नाही. तर यामागील कारणे सर्वात आधी जाणून घ्यायला हवीत. 

हृदयविकाराची कारणे - 
जीममध्ये गेल्यानंतर सर्वात आधी चांगला रिझल्ट मिळावा म्हणून अनेकजण जास्त व्यायाम करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. अशावेळी जास्त व्यायाम केल्याने भविष्यातही हृदयविकार आणि रक्तदाबाचा त्रास जाणवू शकतो. आपल्याला हृदयविकाराची लक्षणे सर्वात आधी माहित असायला हवीत. 

हृदयविकाराची लक्षणे -
व्यायामादरम्यान किंवा नंतर छातीत दुखणे, मळमळ, श्वास घेण्यात अडचण, चक्कर येणे, जास्त घाम येणे ही हृदयविकाराच्या पूर्वी जाणवणारी लक्षणे आहेत. यावरून आपण आपल्याला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो याचा अंदाज लावू शकता. त्यामुळे अशा प्रकारची लक्षणे जाणवल्यास ताबोडतोब दवाखान्यात जाऊन उपचार घेण्याचा प्रयत्न करावा. 

हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी खालील टिप्स करा फॉलो - 
तुमच्या मर्यादा जाणून घ्या. व्यायाम जास्त करू नका. तुमच्या आरोग्याविषयी माहिती ठेवा. नियमित तपासणी केल्याने तुमची आरोग्य स्थिती जाणून घेण्यास मदत होऊ शकते. तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याचे बारकाईने पालन करा. तुम्हाला वेदना वाटत असल्यास, विशेषत: छातीत, किंवा कोणतीही अस्वस्थता, ताबडतोब व्यायाम करताना थांबा आणि मदत घ्या. हायड्रेटेड रहा . घाम येण्यापासून निर्जलीकरण टाळण्यासाठी नियमितपणे पाणी प्या. पुरेशी झोप घ्या . झोपेच्या कमतरतेमुळे तुमच्या हृदयावर ताण येऊ शकतो. तुम्हाला प्रत्येक रात्री 7-8 तासांची झोप मिळत असल्याची खात्री करा. हृदयासाठी निरोगी पदार्थ खा . तुमच्या हृदयासाठी चांगला आहार हृदयाच्या समस्यांचा धोका कमी करू शकतो.
आणखी वाचा - 
कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा तुरुंगात मृत्यू, उत्तर प्रदेशमध्ये पोलीस अलर्ट मोडवर!
सीएम केजरीवाल यांना दिलासा नाही, ईडी कोठडीत 1 एप्रिलपर्यंत वाढ