सीएम केजरीवाल यांना दिलासा नाही, ईडी कोठडीत 1 एप्रिलपर्यंत वाढ

| Published : Mar 28 2024, 04:35 PM IST / Updated: Mar 28 2024, 04:48 PM IST

Arvind Kejariwal

सार

कथित दारू घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या ईडी रिमांडचा आज शेवटचा दिवस होता...

दिल्लीचे मुख्यमंत्री यांना काही दिवसांपूर्वी कथिक मद्य घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आज केजरीवाल यांचा ईडी कोठडीची शेवटचा दिवस होता.त्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. या दरम्यान दोन्ही पक्षाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर न्यायालयाने केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत वाढ केली आहे.

एएसजी एसव्ही राजू यांच्या म्हणण्यानुसार केजरीवाल रेकॉर्ड केले आहे मात्र ते थेट प्रश्नांची उत्तरे देत नसल्यामुळे अजून सात दिवसांची कोठडी वाढवण्याची मागणी करण्यात आली. पुढे ते म्हणाले की,सापडलेल्या डिजिटल डेटाचीही तपासणी केली जात आहे. काही लोकांना गोव्यातून बोलावण्यात आले असून त्यांचा प्रत्यक्ष जबाब नोंदवला जाईल. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी मंजूर केली असून 1 एप्रिल पर्यंत वाढवली आहे.

केजरीवाल यांच्याकडून युक्तिवाद :

केजरीवाल यांच्या वकिलांनीदेखील न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला आहे. हे प्रकरण गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. सीबीआयने ऑगस्ट 2022 मध्ये गुन्हा दाखल केला होता. कोणत्याही न्यायालयाने दोषी ठरवले नसताना मला ईडीकडून अटक का करण्यात आली? मला अटक करण्याचा ईडीचा काय हेतू आहे.

यावर न्यायाधीश म्हणाले की तुम्ही लेखी निवेदन का देत नाही. केजरीवाल म्हणाले, 'सध्या हे प्रकरण दोन वर्षांपासून सुरू आहे. ईडीने 25000 पानांची तपासणी केली आहे. विद्यमान मुख्यमंत्र्यांना अटक करण्यासाठी एक विधान पुरेसे आहे का? आम्ही प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहोत.

पुढे केजरीवाल म्हणाले की, 'ईडी या प्रकरणात दिशाभूल करत आहे आणि 'आप' भ्रष्ट पक्ष असल्याची प्रतिमा निर्माण करत आहे. सरथचंद्र रेड्डी यांना जामीन मिळाल्यानंतर लगेचच भाजपला 55 कोटी रुपये देण्यात आल्याचे मनी ट्रेल ठरले आहे. आम्ही रिमांडला सामोरे जाण्यास तयार आहोत. रिमांडला आमचा विरोध नाही. आमच्याकडे रोख्यांच्या प्रतीही आहेत. त्यावर ईडीने केजरीवाल यांना कोर्टात बोलताना विरोध केला. केजरीवाल यांचे वकील म्हणाले,ते माझ्या फोनचा पासवर्ड देण्यासाठी जबरदस्ती करू शकता का?' तत्पूर्वी, न्यायालयात पोहोचल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना केजरीवाल म्हणाले की, हे राजकीय षडयंत्र असून जनताच त्याचे उत्तर देईल.

आणखी वाचा :

हरीश साळवे यांच्यासह 500 हून अधिक वकीलांचे सरन्यायाधीशांना पत्र, विशिष्ट गटाकडून न्यायव्यवस्थेवर दबाव टाकल्याचा केलाय आरोप

MDMK चे खासदार गणेशमूर्ति यांचे निधन, दोन दिवसांआधी केला होता आत्महत्येचा प्रयत्न

2024 Mood of the Nation Survey: राम मंदिर-डिजिटल इंडिया किंवा इतर, नरेंद्र मोदी सरकारचे सर्वात मोठे यश काय?