कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा तुरुंगात मृत्यू, उत्तर प्रदेशमध्ये पोलीस अलर्ट मोडवर!

| Published : Mar 29 2024, 10:54 AM IST

Mukhtar Ansari UP

सार

कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. मुख्तार अन्सारीवर गेल्या १४ तासांपासून ९ डॉक्टरांची टीम उपचार करत होती.

उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा तुरुंगात मृत्यू झाल्यामुळे उत्तर प्रदेशातील पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे. मुख्तार अन्सारी याला हृदयविकाराचा झटका आल्याने तो तुरुंगात बेशुद्ध अवस्थेत पडला होता. यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे. अन्सारीवर गेल्या 14 तासांपासून 9 डॉक्टरांची टीम उपचार करत होती. मात्र, त्याचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गँगस्टर मुख्तार अन्सारी हा उत्तर प्रदेशच्या बांदा तुरुंगामध्ये होता.

मुख्तार अन्सारीला 2022 मध्ये शिक्षा झाली होती. त्यानंतर पुन्हा दोन प्रकरणात अन्सारीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. मुख्तार अन्सारीवर 61 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याचे सांगितले जाते. मुख्तार अन्सारी याच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेश पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. बांदा, आणि गाजीपूर भागात मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात आली असून कलम 144 लागू करण्यात आले आहे.

मुख्तार अन्सारी कोण होता?

मुख्तार अन्सारी पाच वेळा आमदार राहिला होता. अन्सारीवर 65 पेक्षा जास्त गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते. मुख्तार हा तुरुंगातूनही गँग चालवत असल्याचा आरोप त्याच्यावर होता. मुख्तार अन्सारी याचा एक भाऊ विद्यमान खासदार आहे. उत्तरप्रदेश सरकारने मुख्तार अन्सारीवर कारवाई करत जवळपास 605 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली होती. तसेच त्याचे अनेक बेकायदेशीर व्यवसाय सरकारने बंद केले होते.

मुख्तार अन्सारीच्या मृत्यूची चौकशी होणार?

मुख्तार अन्सारी यांना विषारी औषध देण्यात आले असल्याचा आरोप मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर मुलाने केला आहे. या प्रकरणात चौकशीची मागणी करत न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, मुलाने केलेल्या विषबाधाच्या आरोपानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

आणखी वाचा :

Lok Sabha Election 2024: शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर, मात्र श्रीकांत शिंदे यांचा उल्लेख नाही..

गोविंदाचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश ; उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळणार का ?

मासिक पाळीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या? नेमकी प्रकरण काय ?