सार
सार्वजनिक परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी मंगळवारी सार्वजनिक परीक्षा विधेयक, 2024 लोकसभेत पारित झाले आहे. यानुसार, परीक्षेवेळी होणारे गैरप्रकारासंबंधित कठोर कारवाई केली जाणार आहे.
Public Examination Bill 2024 : सार्वजनिक परीक्षा विधेयक, 2024 लोकसभेत सादर करण्यात आल्यानंतर मंगळवारी (6 फेब्रुवारी) पारित झाले आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाने नुकत्याच या विधेयकाला मंजूरी दिली होती. अशातच परीक्षेवेळी होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी नवा कायदा तयार केला जाणार आहे. या नव्या कायद्यानुसार, 1 ते 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 3 ते 5 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.
विधेयकात उच्च स्तरीय तांत्रिक समितीचा देखील प्रस्ताव आहे. जी कंप्युटरच्या माध्यमातून परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित करण्यासंदर्भात सिफारिश करेल. सार्वजनिक परीक्षा विधेयक, 2024 हे केंद्रीय कायदा असणार आहे. या विधेयकाअंतर्गत संयुक्त प्रवेश परीक्षा आणि केंद्रीय विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षांचा समावेश असेल.
परीक्षेतील गैरप्रकारामध्ये संबंधितांवर कारवाई केली जाणार
सार्वजनिक परीक्षा विधेयक, 2024 सोमवारी (5 फेब्रुवारी) संसदेत सादर करण्यात आल्यानंतर मंगळवारी (6 फेब्रुवारी) लोकसभेत पारित झाले. केंद्रीय मंत्रीमंडळाने नुकत्याच या विधेयकाला मंजूरी दिली होती. या कायद्याअंतर्गत पेपरफुटी, कॉपी प्रकरणामध्ये कोणताही संस्थेचा हात असल्यास त्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे.
परीक्षांमध्ये याआधीही झालेत पेपरफुटीची प्रकरणे
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेपरफुटी होणे ही एक राष्ट्रीय समस्या झाली आहे. यामुळेच पेपरफुटीच्या प्रकारांना आळा बसण्यासाठी केंद्रीय कायदा आणण्याची आवश्यकता होती. गुजरातसारख्या राज्यांनी या समस्येपासून दूर राहण्यासाठी आपले कायदे तयार केले आहेत.
गेल्या वर्षात (2023) सार्वजनिक परीक्षेचा पेपर फुटल्याने राजस्थानमध्ये शिक्षक भरती, हरियाणामध्ये ग्रुप-डी पदासांसाठी सीईटी (CET), गुजरातमध्ये कनिष्ठ लिपिकांची भरती परीक्षा आणि बिहारमध्ये कॉन्स्टेबल भरती परीक्षेसह अन्य परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या.
आणखी वाचा :