White Paper vs Black Paper : मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या कामाचा लेखाजोखा मांडणारा 'ब्लॅक पेपर' काँग्रेसकडून जारी

| Published : Feb 08 2024, 01:05 PM IST / Updated: Feb 08 2024, 01:10 PM IST

 Mallikarjun Kharge releases Black Paper
White Paper vs Black Paper : मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या कामाचा लेखाजोखा मांडणारा 'ब्लॅक पेपर' काँग्रेसकडून जारी
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

केंद्र सरकारच्या श्वेतपत्रिकेला उत्तर देत काँग्रेसने ब्लॅक पेपर जारी करण्यात आला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा 10 वर्षातील कामाचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे.

White Paper vs Black Paper : लोकसभेच्या निवडणूकीआधी (Lok Sabha Elections) भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) आमनेसामने आला आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर कोणत्या ना कोणत्या कारणावरुन हल्लाबोल करत आहेत. केंद्र सरकारकडून संसेदतील अर्थसंकल्पाच्या अधिवेशनादरम्यान श्वेतपत्रिका जारी करणार आहे. यामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारच्या 10 वर्षांतील गैरप्रकारांबद्दल श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून सांगितले जाणार आहे.

अशातच आता काँग्रेसकडून देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारच्या 10 वर्षातील कामांचा लेखाजोखा मांडणारा ब्लॅक पेपर जारी केला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी गुरुवारी (8 फेब्रुवारी) ब्लॅक पेपर जारी केला आहे.

श्वेत पत्राबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत केली होती घोषणा
1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. यादरम्यान, अर्थमंत्र्यांनी म्हटले वर्ष 2014 मध्ये मोदी सरकार स्थापन झाले. मोदी सरकारने 10 वर्षांमध्ये काही संकटांचा सामना करूनही देशाची अर्थव्यस्था सुधारली. याशिवाय श्वेतपत्रिका सदनाच्या पटलावर ठेवणार असल्याचेही निर्मला सीतारमण यांनी म्हटले होते. श्वेतपत्रिकेत UPA सरकारच्या 10 वर्षांच्या सरकारनंतर आम्ही कुठे होते आणि आता कुठे आहोत याबद्दल सांगितले जाणार आहे.

दरम्यान, संसदेत मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्याआधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांनी राज्यसभा आणि लोकसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित केले होते.

आणखी वाचा : 

PM Modi in Parliament : अर्थसंकल्पाच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील वाचा महत्त्वाचे मुद्दे

पेपर फुटीला आता बसणार चाप, लोकसभेत पारित झालेल्या विधेयकाबद्दल जाणून घ्या सविस्तर

'संपूर्ण गांधी कुटुंब मला ते बिस्किट खायला लावू शकले नाहीत', आसामच्या मुख्यमंत्र्यांनी VIRAL VIDEO वरून साधला निशाणा