Article 370: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 च्या निर्णयाचे केले स्वागत, म्हणाले...

| Published : Dec 12 2023, 12:51 PM IST / Updated: Dec 13 2023, 01:37 PM IST

PM Narendra Modi

सार

Supreme Court Decision on Article 370 : जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने संविधानिक असल्याचे म्हटले आहे. या निर्णयावर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

PM Modi on Article 370 : सुप्रीम कोर्टाने सोमवारी (11 डिसेंबर, 2023) जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याबाबतचा ऐतिहासिक निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय कायम ठेवला. या ऐतिहासिक निर्णयावर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

The Hindu या वृत्तसंस्थेच्या वृत्तपत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक लेख लिहिला आहे. या लेखात मोदींनी लिहिले की, "11 डिसेंबर (2023) रोजी सुप्रीम कोर्टाने कलम 370 वर जो निर्णय दिला त्यामुळे एक भारत, श्रेष्ठ भारताची भावना मजबूत झाली आहे.

सुप्रीम कोर्टाने भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता कायम ठेवली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे म्हटले की, आपल्या निर्णयामुळे सुप्रीम कोर्टाने भारताचे सर्वभौमत्व आणि अखंडता कायम ठेवली आहे. कोर्टाने योग्य म्हटले की, 5 ऑगस्ट, 2019 रोजी घेण्यात आलेला निर्णय घटनात्मक एकात्मता वाढविण्याच्या उद्देशाने घेतला गेला होता.

पंतप्रधान मोदी यांचा काँग्रेस पक्षावर निशाणा

जम्मू-काश्मीर प्रकरणी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेवर पंतप्रधान नरेंद्र यांनी निशाणा साधला. मोदी यांनी असे म्हटले की, "स्वातंत्र्यानंतर मुलभूत गोष्टींवर स्पष्ट भूमिका घेण्याऐवजी देशाने संघर्ष होऊ दिला. यामुळे संभ्रम निर्माण झाला. फार दु:खाची गोष्ट आहे की, जम्मू काश्मीर अशा प्रकारच्या मानसिकतेचा शिकार होत गेला. स्वातंत्र्यावेळी, आपल्याकडे राष्ट्रीय एकतेसाठी नवी सुरुवात करण्याचा पर्याय होता. त्याऐवजी आपण संभ्रमित समाजाच्या दृष्टीकोनातून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. याच कारणास्तव दीर्घकाळापर्यंत राष्ट्रीय हितांकडे दुर्लक्ष केले गेले."

आणखी वाचा: 

Article 370 : जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याबाबत सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय, सप्टेंबर 2024पर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश

Article 370 : या न्यायाधीशांनी कलम 370 वर सुनावला ऐतिहासिक निर्णय

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरलेत जगातील सर्वात लोकप्रिय नेते, 76% लोकांनी दर्शवली पसंती