Global Technology Summit 2023: युद्धात गेम चेंजरची भूमिका निभावतेय तंत्रज्ञान - राजनाथ सिंह

| Published : Dec 05 2023, 07:18 PM IST / Updated: Dec 26 2023, 12:04 PM IST

Rajnath Singh Speech on Global Technology Summit 2023

सार

New Delhi: कार्नेगी इंडियाद्वारे ग्लोबल तंत्रज्ञान समिटचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आपल्या देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, तंत्रज्ञान हे युद्धात गेम चेंजरची भूमिका निभावत आहे.

Global Technology Summit Updates: Global Technology Summit Updates: कार्नेगी इंडियाद्वारे ग्लोबल तंत्रज्ञान समिट 2023 चे (Global Technology Summit 2023) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संबोधित केले. यावेळेस संरक्षणमंत्र्यांनी म्हटलं की, “तंत्रज्ञान हे फोर्स मल्टिप्लायर (Force multiplier) आहे, असे म्हटले. एक शिक्षक ऑनलाइन पद्धतीने देश-परदेशातील वेगवेगळ्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना शिकवतो. टेलीमेडिसिन प्रणालीमध्येही आपण पाहू शकता की कशा पद्धतीने देशातील मोठमोठ्या शहरांतील डॉक्टर दूर अंतरावर असणाऱ्या रूग्णांवर औषधोपचार करतात”.

पुढे सिंह यांनी म्हटले की, आज कोणतेही क्षेत्र नसेल ज्या ठिकाणी तंत्रज्ञान पोहोचलेले नाही आणि त्यामुळे मानवाचे आयुष्य सोपे झाले आहे. शिक्षण आणि आरोग्यासारख्या मुख्य क्षेत्राव्यतिरिक्त सार्वजनिक सेवा व बँकिंग क्षेत्रातही तंत्रज्ञानमुळे आपली क्षमता अधिक वाढत चालली आहे.

संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञानाची भूमिका

संरक्षण क्षेत्रातही तंत्रज्ञान हे फोर्स मल्टिप्लायर माध्यम म्हणून काम करत आहे. वर्तमानकाळात ज्या प्रकारे जागतिक परिस्थिती आपण पाहतोय, त्यामध्ये तंत्रज्ञानाची भूमिका अधिक वाढत आहे. गेल्या एक-दोन वर्षांत ज्या प्रकारे परिस्थिती निर्माण होत चाललीय, जेथे रशिया-युक्रेन अथवा इस्रायल-हमासमधील युद्ध असो, या दोन्ही युद्धात तंत्रज्ञानाने कशा प्रकारे गेम चेंजरची भूमिका निभावली आहे, हे कोणापासून लपलेले नाही’ असेही यावेळेस संरक्षणमंत्र्यांनी म्हटलं.

पुढे ते असेही म्हणाले की, “उपग्रह आधारित ट्रॅकिंग सिस्टम, ड्रोन्स, गाइडेड क्षेपणास्र आणि रडार यासारखे आधुनिक तंत्रज्ञान कशा पद्धतीने युद्धातील परिस्थिती बदलत आहेत, हे देखील आपण पाहत आहोत”.

स्टार्टअप ही राष्ट्रीय संपत्ती - अमिताभ कांत

ग्लोबल तंत्रज्ञान समिट 2023 मध्ये भारताचे जी-20 शेरपा अमिताभ कांत यांनी म्हटले की, कशा प्रकारे भारताने डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरची पायाभूत संरचनेस आकार देण्याचे कार्य कसे हाती घेतले आहे आणि यामध्ये तंत्रज्ञान मोठी भूमिका निभावत आहे. याशिवाय भारताच्या जी-20 कार्यकाळाने डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरला महत्त्वपूर्ण रूपरेषाही दिली आहे. तसेच स्टार्टअप ही राष्ट्रीय संपत्ती आहे, असेही अमिताभ म्हणाले.

कंपोनेट मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टिमला सुनिश्चित करावे- एस कृष्णन

ग्लोबल तंत्रज्ञान समिट 2023 कार्यक्रमात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन यांनीही उपस्थिती दर्शवली होती. कृष्णन यांनी असे म्हटले, कम्पोनेंट मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टिममध्ये कशा पद्धतीने सक्षम होता येईल, हे आपल्या देशाने निश्चित केले पाहिजे.तसेच आर्टिफिशियल इंटेलिजेंस ही काही नवी बाब नाही, पण याचा वापर वाढतोय. या क्षेत्रात नव्या गोष्टींना प्रोत्साहन दिले पाहिजे.

आणखी वाचा: 

Uttarkashi Tunnel Rescue : 17 दिवस 41 कामगार फिट राहण्यामागील सीक्रेट

इस्रायलमधील भारतीय नागरिक सुरक्षित आहेत का?

North East Express Train Accident : नॉर्थ-ईस्ट एक्सप्रेसचे 21 डबे घसरले, चौघांचा मृत्यू-70 जण जखमी