Kangra Hit and Run Case : माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या मामेभावासह आणखी एका तरुणाचा मृत्यू, वाचा कसा घडला अपघात

| Published : May 02 2024, 03:24 PM IST

Suresh Raina

सार

हिमाचल प्रदेशातील कांगडा येथे एका रस्ते अपघातात भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याच्या मामेभावाचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अन्य दोन जणांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

Hit and run case :  पठाणकोट-मंडी राष्ट्रीय महामार्गावर सनौराजवळ भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याच्या मामेभावाचा अपघात झाला असता त्याचा मृत्यू झाला आहे. याशिवाय एका तरुणाचाही मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. दुर्घटनेनंतर आरोपी चालकाने घटनास्थळावरून पळ काढला होता. या प्रकरणात आता चालकाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

नक्की काय घडले?
कांगडातील गग्गल विमानतळाजवळ पोलीस स्थान गग्गलच्या अंतर्गत हिट अँड रनचे प्रकरण समोर आले आहे. घटनेची सूचना मिळाल्यानंतर पोलिसांनी फरार टॅक्सी चालकाचा पाठलाग करत मंडी येथून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांगडाच्या गग्गलच्या हिमाचल टिम्बरच्या जवळ टॅक्स चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवक स्कूटीला धडक दिली. यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. घटनेत स्कूटीवरील चालक सौरभ कुमार आणि शुभम यांचा जागीच मृत्यू झाला. गग्गल पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजच्या आधारावर आरोपी शेर सिंह याला अटक केली आहे.

पोलीस निरीक्षक कांगडा शालिनी अग्निहोत्री यांनी घटनेची माहिती देत म्हटले की, गग्गल पोलिसांकडे रात्रीच्या वेळेस हिट अँड रनचे प्रकरण आले होते. यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. मृताची ओळख गग्गल स्थानिक सौरभ आणि बनोई येथील शुभम अशी पटली. या दोघांना एका गाडीने धडक देत फरार झाली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी चालकाचा पाठलाग घेत मंडी येथून ताब्यात घेतले. आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई केली जात आहे.

आणखी वाचा : 

"गोल्डी ब्रार जिवंत.." गोळीबारात दुसऱ्याचाच मृत्यू ; अमेरिकन पोलिसांनी केली पुष्टी

दिल्लीतील 'या' शाळांना मिळाली बॉम्बने उडवण्याची धमकी, जाणून घ्या शाळांची नावे