"गोल्डी ब्रार जिवंत.." गोळीबारात दुसऱ्याचाच मृत्यू ; अमेरिकन पोलिसांनी केली पुष्टी

| Published : May 02 2024, 11:05 AM IST / Updated: May 02 2024, 11:11 AM IST

Goldy Brar

सार

भारतातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार गोल्डी ब्रारची हत्या झाल्याची बातमी काल पसरली होती. पण ही बातमी म्हणजे अफवा आहे. गोल्डी ब्रार अजूनही जिवंत आहे. या बातमीला अमेरिकेतील पोलिसांनी दुजोरा दिला नाही.

गुन्हेगार गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या झाल्याचे मेसेज काल सोशल मीडियावर वाऱ्या सारखे फिरले.सगळ्यांना वाटलं भारतातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार मारला गेला.गोल्डी ब्रारच्या हत्येच्या वृत्तामुळे भारतात विविध चर्चांना उधाण आलं. आता या प्रकरणातील सत्य समोर आलय. अमेरिकेत हत्या झाली हे खरं आहे. पण तो गोल्डी ब्रारर नाहीय. हुबेहूब त्याच्यासारखा दिसणारा व्यक्ती आहे. त्यामुळे ही अफवा पसरली. ज्या व्यक्तीची हत्या झालीय, तो मूळचा आफ्रिकेचा राहणारा आहे.या अफवांमुळे अमेरिकेतील वृत्तवाहिन्यांनी देखील ब्रारचा मृत्यू झाला आल्याचे वृत्त दिले होते. गोल्डी ब्रार प्रसिद्ध पंजाबी सिंगर सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा मास्टरमाइंड आहे.

भारतीय दूतावासाने साधला संपर्क :

अमेरिकेतील काही स्थानिक वृत्तानुसार, या घटनेत ठार झालेल्या व्यक्तीचे नाव झेवियर गलदानी असून तो 37 वर्षीय आहे. गोल्डी ब्रारच्या खोट्या मृत्यूच्या अहवालावर पोलीस विभागाने सांगितले की, आम्हाला जगभरातून मृत्यूबाबत प्रश्न विचारले जात आहेत.चुकीच्या माहितीमुळे आम्हाला सकाळपासून अनेक प्रकारचे फोन येत आहेत. गोल्डी ब्रारबद्दलची बातमी सर्वप्रथम फॉक्स या स्थानिक वेबसाइटने दिली होती पण त्यात नाव लिहिलेले नव्हते. भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनीही गोल्डीच्या हत्येबाबत माहितीसाठी फ्रेस्नो पोलिसांशी संपर्क साधला.

कोण आहे गोल्डी ब्रार :

गेल्या अनेक दिवसांपासून भारतात मोस्ट वाँटेड गँगस्टर गोल्डी ब्रार हा सतत चर्चेत आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येनंतर गोल्डी ब्रार आणखीनच चर्चेत आला. गोल्डी ब्रारनेच सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली. अमेरिकेत बसून गोल्डी ब्रार हा लॉरेन्स बिश्नोई गँग चालवत असल्याचे सांगितले जाते. पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीमध्ये या गँगचे नेटवर्क आहे.

आणखी वाचा :

Salman Khan House Firing : आरोपी अनुज थापनच्या आत्महत्येवर UBT नेत्याने उपस्थितीत केले प्रश्न, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केली ही विनंती

मोठी बातमी! सलमान खानच्या घरावरील गोळीबार करणाऱ्या एका आरोपीचा उपचार दरम्यान मृत्यू ;आत्महत्येचा केला होता प्रयत्न