सार

इराणने शनिवारी (13 एप्रिल) एक इस्रायली मालवाहू जहाज ताब्यात घेतले. या जहाजात 25 क्रू मेंबर्स होते, त्यापैकी 17 भारतीय चालक होते. या प्रकरणी रविवारी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इस्लामिक देशाचे अमीर अब्दोलाहीन यांना फोन केला. 

इराणने शनिवारी (13 एप्रिल) एक इस्रायली मालवाहू जहाज ताब्यात घेतले. या जहाजात 25 क्रू मेंबर्स होते, त्यापैकी 17 भारतीय चालक होते. या प्रकरणी रविवारी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इस्लामिक देशाचे अमीर अब्दोलाहीन यांना फोन करून क्रूच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आणि भारतीय क्रू मेंबरला भेटण्याची परवानगी मागितली. यावर, आज, सोमवारी (15 एप्रिल) इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की ते भारत सरकारच्या अधिकाऱ्यांना सदस्यांना भेटण्याची परवानगी देतील.

शनिवारी जहाज ताब्यात घेतल्यानंतर क्रू मेंबर्सची लवकरच सुटका व्हावी, यासाठी भारताने इराणशी संपर्क साधला होता. यावर जयशंकर यांनी इस्रायल आणि इराणमधील वाढता तणाव लक्षात घेता तणाव टाळण्याचे आणि संयम बाळगण्याचे आवाहन केले होते. परराष्ट्रमंत्र्यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे.

इराण अप्रत्यक्ष इस्रायलच्या विरोधात :
आत्तापर्यंत गाझामध्ये हमाससोबत सुरू असलेल्या युद्धात इराण अप्रत्यक्षपणे इस्रायलच्या विरोधात उभा राहिला आहे. मात्र, या हल्ल्यानंतर दोन्ही देश आता आमनेसामने येण्याची शक्यता असून युद्ध पेटण्याची शक्यता आहे. यामुळे आता मध्य आशियात तणाव वाढणार असून अस्थिर वातावरण होऊ शकते. इराणकडून हल्ल्याच्या भीतीने इस्रायलनेही तयारी सुरू केली आहे. अशा स्थितीत इराणनेही आता प्रत्युत्तर दिल्यास दुसरे युद्ध सुरू होईल, अशी शक्यता समारीक तज्ञ व्यक्त करत आहेत.

इस्रायलची तयारी काय ?
इस्रायलच्या तयारीमुळे येथील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परदेशी नागरिकांना त्यांच्या दूतावासांकडून सतर्क करण्यात आल्याचे स्थानिक माध्यमांचे म्हणणे आहे. नागरिकांना देखील राशन घरात भरून ठेवण्यास संगितले आहे. इस्त्रायलने या हल्ल्याची अधिकृतपणे जबाबदारी घेतलेली नाही. दरम्यान, इराणचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद रायसी यांनी या हल्ल्याला उत्तर दिले जाईल, असे म्हटले आहे.

इस्रायलने इराणचे लक्षरी हल्ले टाळण्यासाठी जीपीएस आणि नेव्हिगेशन प्रणाली बंद करण्यास सुरुवात केली आहे. इस्रायल मार्गदर्शित क्षेपणास्त्रे किंवा ड्रोनने हल्ला करू शकतो, अशी भीती इराणला आहे. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, तेल अवीव आणि जेरुसलेमच्या लोकांनी लोकेशन बेस्ड ॲप वापरता येत नसल्याची तक्रार केली आहे. याशिवाय इस्रायलने लष्करातील सर्व लढाऊ तुकड्यांचे पत्ते देखील डिलीट केले आहेत. या शिवाय सैनिकांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या असून इस्रायलच्या सीमेवर सैनिक आणि शस्त्रास्त्रांची तैनाती वाढवण्यात आली आहे
आणखी वाचा - 
संतापजनक! 45 वर्षीय व्यक्तीकडून चिरमुरीडवर बलात्कार, मिरा भायंदरमधील घटनेविरोधात स्थानिकांकडून आंदोलन
Crime : पाच वर्षीय चिमुरडीवर नराधमांनी बलात्कार करत केली हत्या, गोव्यातील घटनेने खळबळ