सार

Mira Bhayandarr Crime : मिरा भायंदर येथे एका चिमुरडीवर 45 वर्षीय व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Crime News : मिरा भायंदर येथील एक संतापजनक प्रकरण समोर आले आहे. येथील 45 वर्षीय व्यक्तीने चार वर्षीय मुलीबर बलात्कार केला. सदर घटना मिरा रोड येथील रामदेव पार्क येथील असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणातील आरोपीचे नाव मोहम्मद दराज असून त्याला स्थानिकांनी पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

स्थानिकांकडून घटनेचा विरोध
पीडित मुलीवर बलात्कार केल्याच्या घटनेनंतर मिरा रोडमधील स्थानिकांनी संपात व्यक्त केला. या घटनेनंत स्थानिकांनी आंदोलन केल्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशीही मागणी स्थानिकांनी केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडीओ आणि फोटोमध्ये मास विक्री केल्या जाणाऱ्या दुकानाची तोडफोड करण्यात आल्याचे दिसून आले आहे. याशिवाय दुकानाबाहेर मोठ्या संख्येने नागरिक जमा झाल्याचेही दिसतेय.

आरोपीचे मास विक्रीचे दुकान
आरोपी दराज याचे मिरा रोड येथील ऑरेंज रुग्णालयाजवळ महाराष्ट्र चिकन शॉप नावाचे दुकान आहे. मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिकांनी तातडीने आरोपीच्या दुकानात धाव घेतली. यानंतर आरोपीला पकडत नवघर पोलिस स्थानकातील पोलिसांच्या ताब्यात दिले.

आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल
रिपोर्ट्सनुसार, सुरूवातीला पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला नव्हता. पण स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत घटनेच्या विरोध दर्शवत आंदोलन केले असता आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील अधिक तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

आणखी वाचा : 

Crime : पाच वर्षीय चिमुरडीवर नराधमांनी बलात्कार करत केली हत्या, गोव्यातील घटनेने खळबळ

Mumbai Crime News : महिलांचे फोटो मॉर्फ करून व्हायरल केले न्यूड फोटो; मुंबईतील धक्कादायक बाब आली समोर