Share Market Budget 2024 : अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर मार्केट गेले वर?

| Published : Jul 23 2024, 11:44 AM IST

Share market open on Saturday 18th may

सार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सकाळच्या सत्रात शेअर बाजार वर गेला आहे कारण विकासाच्या मोठ्या घोषणा होणार असल्याची अपेक्षा आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प मांडणार आहेत. शेअर बाजारावर या आर्थिक संकल्पाचा परिणाम होत असल्याचे सकाळच्या सत्रातून दिसून आले आहे. विकासाच्या मोठ्या घोषणा अर्थसंकल्पात मांडल्या जाणार असल्यामुळे शेअर बाजार वर गेला आहे. आता बजेट सादर केल्यानंतर शेअर बाजार काय प्रतिक्रिया देतो याकडे लक्ष देणार आहे. 

आज होऊ शकते मोठी उलाढाल? - 
थोड्याच वेळात अर्थमंत्री निर्मल सीतारामन अर्थसंकल्प मांडणार आहेत. शेअर बाजारामध्ये सध्याच्या घडीला खालीवर बाजार होत असल्याचे दिसून येत आहे. बीएसईचे मार्केट कॅप 447.97 लाख कोटी रुपयांवर आले होते. त्यापूर्वी भांडवल हे 448 लाख कोटी रुपये होते. 30 शेअरच्या सेन्सेक्समधील 15 शेअर तेजीत तर 15 शेअर घसरणीवर होते. एचसीएल टेक हा शेअर पिछाडीवर पडला असल्याचे दिसून आले आहे. शेअर बाजारात काही शेअर्स हे खाली गेल्याचे दिसून आले आहे. बजेटनुसार निफ्टी ऑईल अँड गँस, कंझ्युमर ड्युराबेल्स, हेल्थ केअर, फार्मा, मेटल, आयटी शेअर्स खाली गेले आहेत. बँक निफ्टीमध्ये किंचित तेजी दिसली आहे. 

सकाळच्या सत्रात शेअर्सच्या किंमती वाढल्या - 
सकाळच्या सत्रात शेअर्सच्या किंमती वाढल्या आहेत. सेन्सेक्सच्या २५ स्टॉकने आघाडी घेतली आहे. इंडसइंड बँक, पावर ग्रिड, एचडीएफसी बँक, एचसीएल टेक आणि सन फार्मामध्ये घसरण दिसून आले आहे. निफ्टीच्या टॉप गेनरमध्ये अल्ट्राटेक, एचडीएफसी लाईफ, आयसर मोटर्स, बजाज फिनसर्व्ह आणि ग्रासिम हे शेअर्स होते. बजेट भाषण सुरु होताना शेअर बाजाराने सकाळीच दमदार सुरुवात केली आहे. 

सध्या काय स्थिती आहे? - 
सकाळच्या सत्रात शेअर बाजार हिंदोळ्यावर असण्याचे दिसून आले आहे. घोषणा आणि विकासाच्या मुद्यावर हा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. झारखंड, हरियाणा आणि महाराष्ट्र येथे विधानसभा निवडणूका होणार असून या राज्यांना खास अनुदान दिले जाणार आहे. अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी मांडला जाणार असून यामध्ये करदात्यांना काय मिळणार याकडे लक्ष दिले जाणार आहे. 
आणखी वाचा - 
पावसाळ्यात कोरड्या त्वचेची काळजी कशी घ्यावी? फॉलो करा या टिप्स
NEET च्या वादग्रस्त प्रश्नांची चौकशी करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश