पावसाळ्यात कोरड्या त्वचेची काळजी कशी घ्यावी? फॉलो करा या टिप्स
- FB
- TW
- Linkdin
केमिकल फ्री क्लिंजरचा वापर
कोरड्या त्वचेच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी अल्कोहोल किंवा केमिकल फ्री क्लिंजरचा वापर करावा. ग्लाइकोलिक अॅसिड अथवा सॅलिसिलिक अॅसिडचा वापर करण्यात आलेल्या क्लिंजरचा अजिबात वापर करू नये. यामुळे त्वचा अधिक कोरडी होण्याची समस्या वाढली जाईल. कोमल आणि मऊ त्वचेलाठी मध, दूध, कोरफड, ग्लिसरिनयुक्त क्लिंजरचा वापर करावा.
अल्कोहोल फ्री टोनरचा वापर
त्वचेचा पीएच स्तर टिकवून ठेवण्यासाठी टोनरचा वापर करणे फायदेशीर ठरते. त्वचेवर पोर्स दूर करण्यासाठी टोनर मदत करू शकते. कोरडी त्वचा अथवा संवेदनशील त्वचेसाठी गुलाब पाणी किंवा लाइट टोनरचा वापर करावा. याशिवाय कोरड्या त्वचेच्या काळजीसाठी मॉइश्चराइजिंग करणारे आणि अल्कोहोल फ्री टोनरचा वापर करावा.
फेस सीरम लावा
कोरड्या त्वचेच्या काळजीसाठी फेस सीरमचा वापर करणे फायदेशीर ठरेल. याची निवड करताना हायल्यूरोनिक अॅसिड (Hyaluronic Acid), व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, अँटीऑक्सिडेंटयुक्त फेस सीरमचा वापर करावा. यामुळे त्वचेला अधिक फायदा होतो आणि कोरड्या समस्येपासून दूर राहता.
त्वचेला मॉइश्चराइजिंग करणे महत्वाचे
कोरडी त्वचा असणाऱ्यांनी प्रत्येक ऋतूत त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात कोरड्या त्वचेची काळजी घेण्यासाठी वेळोवेळी त्वचेला मॉइश्चराइज लावणे विसरु नका. यामुळे त्वचेची चमक टिकून राहिल. पावसाळ्यात अधिक चिकट मॉइश्चराइजरएवजी नॉन-स्टिकी क्रिमचा अथवा जेलचा वापर करावा.
त्वचेला हाइड्रेट ठेवा
पावसाळ्यात बहुतांशणांची त्वचा लवकर कोरडी होऊ लागते. यापासून दूर राहण्यासाठी त्वचा हाइड्रेट ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी आणि मोसमी भाज्यांसह फळांचे सेवन करावे.
आंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करणे टाळा
पावसाळ्यात काहीजण गरम पाण्याचे आंघोळ करतात. त्वचेवर अत्याधिक प्रमाणात गरम पाण्याचा वापर केल्यास त्वचा कोरडी होण्यास सुरुवात होते. तुमची त्वचा अधिक कोरडी आणि संवेदनशील असल्यास गरम पाण्याएवजी कोमट पाण्याचा आंघोळीसाठी वापर करू शकता.
आणखी वाचा :