Devendra Fadnavis

Share this Video

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत यंदा केवळ 50 टक्के पाऊस पडल्याचे सांगत परिस्थिती अतिशय गंभीर असल्याचे फडणवीस म्हणाले. पिके पूर्णपणे करपली असून सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. विहिरींमध्येही पाणी नसल्याने पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शनिवारपूर्वी दुष्काळाचा जीआर काढला जाईल आणि त्यानंतर उपाययोजना सुरू केल्या जातील, असे फडणवीस यांनी सांगितले. शेतकऱ्यांना रब्बी हंगाम घेण्यासाठी मदत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जनावरांसाठी चारा आणि थेट आर्थिक मदत देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर्जमाफी प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही फडणवीस म्हणाले. काही बँकांनी अतिरिक्त व्याज लावून खाती पाठवल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना कडक सूचना देण्यात आल्या असून अतिरिक्त व्याज काढून सुधारित खाती पाठवली जात आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जवळपास सहा ते सात लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येतील, असेही त्यांनी सांगितले.

Related Video