दुबईला अल्लाहच्या क्रोधाचा सामना करावा लागला कारण... स्वामीनारायण मंदिरावरून पाकिस्तानचा धक्कादायक निर्णय

| Published : Apr 22 2024, 05:00 PM IST / Updated: Apr 22 2024, 05:15 PM IST

पाकिस्तानी बोलणारी व्यक्ती

सार

एक पाकिस्तानी व्यक्तीने दुबईतील ऐतिहासिक पुराचा संबंध अबू धाबूच्या शेजारच्या अमिरातीमध्ये स्वामीनारायण मंदिर हा हिंदू मंदिराच्या बांधकामाशी जोडला आहे. 

एक पाकिस्तानी व्यक्तीने दुबईतील ऐतिहासिक पुराचा संबंध अबू धाबूच्या शेजारच्या अमिरातीमध्ये स्वामीनारायण मंदिर हा हिंदू मंदिराच्या बांधकामाशी जोडला आहे. असा धक्कादायक दावा भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 फेब्रुवारी रोजी मंदिराचे उदघाटन केल्यानंतर काही महिन्यानंतर आला आहे, प्रदेशाच्या धार्मिक क्षेत्रातील एक महत्वाचा क्षण आहे. 

पाकिस्तानी व्यक्ती काय म्हटली? - 
युनायटेड अरब अमिराती म्हणजेच दुबई हे खासकरून त्यांच्या येथे असणाऱ्या रखरखीत वाळवंटासाठी ओळखले जाते. दुबईमध्ये आतापर्यंतचा सर्वात जास्त पाऊस झाला असून हा एक उच्च रेकॉर्ड असल्याचे सांगण्यात येत आहे. दुबईमध्ये पूर कसा आला यावरून तर्क वितर्क लावले जात असताना एका पाकिस्तानी व्यक्तीने आरोप केला आहे की, "दुबईला पावसाच्या वादळाच्या रूपात अल्लाहच्या क्रोधाचा सामना करावा लागला कारण त्यांनी अलीकडेच मूर्ती भंग करणाऱ्यांच्या देशात मूर्तिपूजकांसाठी मंदिर बांधले," असे त्याने म्हटले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिराबाबत काय म्हटले होते? - 
"हे मंदिर संपूर्ण जगासाठी जातीय सलोख्याचे आणि जागतिक एकतेचे प्रतीक बनेल. UAE चे सहिष्णुता मंत्री शेख नाह्यान अल मुबारक येथे उपस्थित आहेत आणि त्यांनी व्यक्त केलेले विचार हे आमच्या स्वप्नांच्या बळकटीचे वर्णन करणारे शब्द होते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. 

एनसीएमचे हवामान तज्ञ काय म्हटले? - 
"चिंतेची गरज नाही; सध्याच्या परिस्थितीत मुसळधार पावसाचा समावेश नाही. गेल्या आठवड्यातील घटनेशी त्याची तुलना करता येणार नाही. ती तीव्र होणार नाही; ते ऐवजी मध्यम आहेत, ढग पश्चिम किनाऱ्यावरून यूएईकडे सरकत आहेत, असे हवामान तज्ञ डॉ. हबीब यांनी म्हटले आहे. "हलका पाऊस किंवा रिमझिम पावसाची शक्यता आहे. हे ढग अबुधाबीकडे वळले आहेत, परिणामी हलका पाऊस पडेल, नंतर पूर्वेकडे पर्वतांच्या दिशेने प्रगती होईल, जेथे ढग निर्माण झाल्याने फक्त डोंगराळ भागात थोडा जास्त मध्यम पाऊस पडू शकतो. बुधवारी सकाळी सर्व ढगांचे आवरण UAE च्या बाहेर ओमानच्या दिशेने सरकेल, असेही त्यांनी पुढं म्हटले आहे.
आणखी वाचा - 
पुण्यातील कोचिंग सेंटरच्या 50 विद्यार्थ्यांना विषबाधा, रुग्णालयात दाखल; पोलिसांनी दिली ही मोठी अपडेट
महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा झटका, अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार माजी आमदार