महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा झटका, अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार माजी आमदार

| Published : Apr 22 2024, 10:01 AM IST / Updated: Apr 22 2024, 10:08 AM IST

DCM Ajit Pawar

सार

Lok Sabha Election 2024 : ऐन लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसचे माजी आमदार सोमवारी (22 एप्रिल) अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

Maharashtra Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सोमवारी (22 एप्रिल) काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. यामुळे उद्धव ठाकरेंच्या रायगड जागेवरील उमेदवार अनंत गीते यांना निवडणुकीवेळी जोरदार टक्कर मिळण्याची शक्यता आहे. खरंतर, मुश्ताक अंतुले रायगड जिल्ह्यातील अल्पसंख्यांकांसाठी बडे नेते आहेत. याशिवाय माजी मुख्यमंत्री एआर अंतुले यांचे जावई आहेत.

अजित पवारांच्या गटात करणार एण्ट्री
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तटकरे यांनी म्हटलेय की, “महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत बॅ. ए. आर. अंतुले साहेब यांचे राजकीय वारसदार आणि गेली ४० वर्षे राजकारणात कार्यरत असलेले महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे माजी अध्यक्ष, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार मुश्ताक अंतुले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश कऱणार आहेत.”

उद्धव ठाकरेंच्या गटाची धाकधुक वाढली
महाराष्ट्रात इंडिया आघआडीच्या समस्या कमी होताना दिसून येत नाहीयेत. इंडिया आघाडीतील काँग्रेस पक्षाचे माजी आमदार मुश्ताक अंतुरे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. अशातच काँग्रेसला ऐन निवडणुकीवेळी महाराष्ट्रात मोठा धक्का बसला आहे.

दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाचे रायगडमधील उमेदवार अनंत गीते यांना निवडणुकीवेळी मोठी टक्कर मिळण्याची शक्यता आहे. यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाची धाकधुक वाढली आहे.

कोण आहेत मुश्ताक अंतुरे?
मुश्ताक अंतुले सुनील तटकरे यांचे जवळचे मित्र आहेत. याशिवाय महाराष्ट्रात प्रदूषण नियंत्रण बोर्डातही अंतुले यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. मुश्ताक अंतुले आणि सुनील तटकरे यांचे जवळचे संबंधही आहेत.

याशिवाय राज्याचे आठवे मुख्यमंत्री एआर. अंतुले यांच्या निधनानंतर मुश्ताक अंतुले यांनी बॅरिस्टर एआर. अंतुले यांचा राजकीय वारसा पुढे नेला आहे. मुश्ताक अंतुले एक निष्ठावंत नेते म्हणून ओखळले जाते. ते गेल्या काही वर्षांपासून काँग्रेससाठी काम करत होते.

याधीही काँग्रेसला महाराष्ट्रात मोठे झटके
महाराष्ट्रात काँग्रेसला याआधीही मोठे झटके बसले आहेत. मिलिंद देवरा यांनी काँग्रेसची साथ सोडत एकनाश शिंदे यांच्या शिवसेनेत एण्ट्री केली होती. यानंतर 40 वर्षीय काँग्रेसमध्ये राहिलेले बाबा सिद्दीकी यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. याशिवाय अशोक चव्हाणांनीही काँग्रेसला गुडबाय करत भाजपात प्रवेश केला होता.

आणखी वाचा : 

Lok Sabha Election 2024 : सुप्रिया सुळेंनी घेतलेय सुनेत्रा पवारांकडून एवढ्या लाखांचे कर्ज, बारामतीत एकमेकांविरुद्ध लढणार

BJP Candidate List : अखेर एकनाथ शिंदेंनी ऐकले ! या जागेवरून नारायण राणे लढणार लोकसभा निवडणूक

Read more Articles on