सार

कोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना महत्त्वाची औषधे, स्पेशल डाएटसाठी घराचे जेवण, पुस्तके यांच्यासह काही गोष्टींसाठी परवानगी दिली आहे.

Kejriwal In Tihar Jail : ईडी कोठडी पूर्ण झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 15 एप्रिल पर्यंत न्यायालयीन तुरुंगात पाठवण्यात आले आहे. राउज एवेन्यू कोर्टात (Rouse Avenue Court) केजरीवाल यांना हजर केले असता ईडीने (ED) त्यांच्या पुढील कोठडीची मागणी केली नाही. यामुळेच अरविंद केजरीवाल यांना न्यायालयीन तुरुंगात पाठवण्याचा कोर्टाने निर्णय घेतला आहे. याशिवाय अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाहीत. ते तुरुंगातूनच दिल्लीचे सरकार चालवणार आहेत.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले होते की, त्यांना मधुमेहाचा आजार असल्याने त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे. अशातच त्यांना अ‍ॅलर्जी आणि इन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे केजरीवाल यांनी तुरुंगात गादी, बेडशीट, दोन उश्या आणि रजई मिळावी अशी मागणी केली आहे. कोर्टाने यासाठी मान्यताही दिली आहे.

महत्त्वाची औषध आणि मेडिकल डिवाइसची मागणी
केजरीवाल यांनी तुरुंगात असताना त्यांना महत्त्वाची औषध आणि रक्तातील साखर तपासून पाहण्यासाठई मेडिकल डिवाइसची मागणी केली आहे. याशिवाय शुगर सेंसर, शुगर सेंसरचे चार्जर, सेंसर रीडर आणि सातत्याने मॉनिटरिंगसाठी ग्लूकोमीटरही हवे असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे. कोर्टाने तुरुंगाच्या प्रशासनाला केजरीवाल यांना महत्त्वाची औषध द्यावीत याचे निर्देश दिले आहेत.

याशिवाय कोर्टाने म्हटलेय की, तुरुंग प्रशासनाकडे वेळीच काही गोष्टी उपलब्ध झाल्या नाहीत तर केजरीवाल यांना आपल्याकडील शुगर सेंसर, सेंसर रीडर अथवा ग्लूकोमीटरचा वापर करू शकतात.

घरचे जेवण आणि पाण्याची मागणी मंजूर
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे ब्लड शुगर अचानक कमी जास्त होत असल्याने त्यांना चॉकलेट, ग्लूकोज, मधुमेहावरील औषध देण्यात यावीत अशी मागणी केली होती. याव्यतिरिक्त स्पेशल डाएट आणि घरी तयार केलेल्या जेवणासह पाण्याची मागणी केली होती. कोर्टाने या गोष्टींसाठीही परवानगी दिली आहे.

पुस्तके आणि पेन वापरण्यासही परवानगी
तुरुंगात असताना केजरीवाल यांना स्वत:चा चष्मा वापरता येणार आहे. तुरुंगाच्या अधीक्षकांना सांगण्यात आलेय की, केजरीवाल यांच्या निवेदनावर विचार करावा. ज्यामध्ये पुस्तके, नोटपॅड आणि पेन देण्याची मागणी केली आहे. तुरुंगाच्या नियमांनुसार, त्यांना या सर्व वस्तू दिल्या जातील. तुरुंगाकडे या वस्तू नसल्यास ते स्वत: कडील पुस्तके, नोटपॅड आणि पेनाचा वापर करू शकतात. केजरीवाल यांना तुरुंगात असताना आपले धार्मिक लॉकेटही घालता येणार आहे, जे सध्या त्यांच्या गळ्यात आहे.

आणखी वाचा :

अबकारी धोरण प्रकरण : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

Video : गुवाहाटी विमानतळाच्या छताचा पावसामुळे एक भाग कोसळला, प्रवाशांमध्ये उडाली खळबळ

'निवडणूक रोख्यांचा विरोध करणाऱ्यांना लवकरच पश्चाताप होईल', पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल