सार

गुवाहाटी विमानतळाच्या छताचा एक हिस्सा कोसळल्याने खळबळ उडाली. खरंतर पाऊस आणि जोरात सुटलेल्या वाऱ्यामुळे छत कोसळले गेले.

Viral Video : गुवाहाटी विमानतळाच्या छताचा एक हिस्सा कोसळल्याची घटना रविवारी (31 मार्च) घडली. खरंतर मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे छताचा एक भाग कोसळला गेला. याच कारणास्तव गुवाहाटीमधील प्रसिद्ध बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानताळवरील (Lokpriya Gopinath Bordoloi International Airport) प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. छत कोसळल्याच्या प्रकारानंतर काहीवेळासाठी तेथील कामकाज बंद करण्यात आले. या घटनेचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.

विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती
गुवाहाटी विमानतळाच्या छताचा एक हिस्सा कोसळल्याच्या घटनेची माहिती विमानतळाच्या एका अधिकाऱ्यांनी दिली. त्यांनी म्हटले की, कोणीही जखमी झाल्याची माहिती नाही. खरंतर, आउटलेट पाईप गळत असण्यासह वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे छताचा एक भाग कोसळला गेला.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये विमानतळाच्या परिसरात पावसाचे पाणी साचल्याचे दिसून येत आहे. याशिवाय विमानतळाच्या छतामधून पाणी गळतेय आणि एक कर्मचारी फरशी स्वच्छ करतानाही दिसून येत आहे.

गुवाहाटीमध्ये मुसळधार पाऊस
गुवाहाटीला मुसळधार पावसाने झोडपले आहे. विमानतळाच्या परिसरात असणारी झाडे कोसळली गेलीत. यामुळे प्रवाशांना विमानतळापर्यंत पोहचण्यास अडथळा निर्माण झाला. यावर मुख्य विमानतळ अधिकाऱ्यांनी म्हटले की, आम्ही तातडीने कोसळलेली झाडे उचलली. याशिवाय वादळामुळे छताचा एक भागही उडून गेला. मी व्यक्तिगत तेथील स्थितीवर लक्ष ठेवून आहे. जेणेकरून प्रवाशांची कोणतीही गैरसोय होणार नाही. वादळ आणि मुसळधार पावसामुळे वातावरण बिघडले गेले आहे. अशातच आम्ही सहा उड्डाणे वळवली आहेत. आता गुवाहाटीमधील वातावरण व्यवस्थितीत झाल्याने विमानांचे सुरळीत उड्डाण सुरू झाले आहे.

आणखी वाचा : 

'निवडणूक रोख्यांचा विरोध करणाऱ्यांना लवकरच पश्चाताप होईल', पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

1 एप्रिलपासून LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत 32 रुपयांनी घट, जाणून घ्या मुंबई ते दिल्लीतील नवे दर

दिल्लीजवळ भीषण कार अपघातात अपघातात ड्रायव्हर सोबत 2 मुलांचा मृत्यू, उभ्या ट्रकला जाऊन ठोकली एसयूव्ही गाडी