अबकारी धोरण प्रकरण : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

| Published : Apr 01 2024, 12:16 PM IST

Arvind Kejriwal Delhi CM
अबकारी धोरण प्रकरण : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. त्यांच्या पत्नी ट्विटरच्या माध्यमातून अपडेट देत असल्याचं आपल्याला दिसून येत.

 दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. त्यांच्या पत्नी ट्विटरच्या माध्यमातून अपडेट देत असल्याचं आपल्याला दिसून येत. अरविंद केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर केजरीवाल हे ईडीच्या ताब्यात आहेत.

केजरीवाल यांना 1 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती, त्यानंतर आता त्या कोठडीची मुदत वाढवण्यात आली आहे. ईडीने न्यायालयात सांगितले की त्यांनी गोव्यातील आपच्या नेत्यांचे जबाब नोंदवले आहेत, त्यानंतर आता कोठडीत वाढ करण्यात यावी अशी त्यांच्या वतीने मागणी करण्यात आली होती. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध म्हणून इंडिया आघाडीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला होता. 

यावेळी केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल या उपस्थित होत्या. सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार आणि तेजस्वी यादव यांनी या निषेध मोर्चाला उपस्थिती दर्शवली होती. सुनीता केजरीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांनी लिहिलेले पत्र वाचून दाखवले, त्यामध्ये सहा हमी त्यांनी सांगितल्या होत्या. त्यामध्ये लोकांच्या मूलभूत सुविधांचा समावेश होता. 
आणखी वाचा - 
'निवडणुकीत विजय झाल्यास व्हिस्की अन् बिअर देणार...',चिमूरच्या वनिता राऊत यांचे मतदारांना विचित्र आश्वासन
Lok Sabha Election 2024: शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर, मात्र श्रीकांत शिंदे यांचा उल्लेख नाही..