Delhi Car Blast: दिल्ली कार स्फोटात वापरलेली Hyundai i20 सलमानच्या नावावर नोंदणीकृत होती, जी त्याने आधीच विकली होती. पोलीस सध्याच्या मालकाचा शोध घेत आहेत. या स्फोटात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे, तर २४ जण जखमी आहेत.
Delhi Car Blast: दिल्ली कार स्फोट प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, ज्या Hyundai i20 कारमध्ये स्फोट झाला, ती सलमान नावाच्या व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत होती. पोलिसांनी सलमानला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. सलमानने सांगितले की, त्याने ही गाडी काही काळापूर्वी विकली होती. आता या प्रकरणात गाडीच्या सध्याच्या मालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके आरटीओशी संपर्क साधत आहेत. आरटीओच्या नोंदींच्या आधारे गाडी विकल्याचे आणि दुसऱ्याच्या नावावर हस्तांतरित केल्याचे स्पष्ट होईल.
स्फोटात आतापर्यंत १० ठार, २४ जखमी
दिल्ली कार बॉम्बस्फोटात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे, तर २४ जण जखमी आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः एलएनजेपी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. त्यानंतर ते लाल किल्ल्याजवळील घटनास्थळीही पोहोचले. ज्या कारच्या मागच्या भागात स्फोट झाला, त्यात तीन जण प्रवास करत होते, अशी माहिती आहे.


