- Home
- India
- Delhi Car Blast : दिल्ली हादरली! लाल किल्ल्याजवळ कार बॉम्बस्फोटानंतरचा 'तो' रक्ताळलेला विध्वंस; 10 PHOTOS पाहून काळजाचे पाणी होईल!
Delhi Car Blast : दिल्ली हादरली! लाल किल्ल्याजवळ कार बॉम्बस्फोटानंतरचा 'तो' रक्ताळलेला विध्वंस; 10 PHOTOS पाहून काळजाचे पाणी होईल!
Delhi Car Blast: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर-1 जवळ सोमवारी संध्याकाळी 7 वाजता पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये स्फोट झाला. स्फोटानंतर आजूबाजूच्या गाड्यांना आग लागली. या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले.

लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या पार्किंग-1 जवळून हळू जाणाऱ्या कारमध्ये अचानक स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या गाड्यांनीही पेट घेतला.
स्फोटानंतर दिल्लीसह मुंबई, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यांतील पोलिसांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
स्फोटानंतर NIA आणि NSG सह सर्व तपास यंत्रणा, दिल्ली पोलीस, FSL टीम घटनास्थळी पोहोचल्या आहेत. सध्या स्फोटाच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.
मृतांचे मृतदेह लोक नारायण जयप्रकाश रुग्णालयात (LNJP) नेण्यात आले आहेत. मृतांचा आकडा वाढू शकतो. हा एक तीव्र स्फोट होता. स्फोट इतका जोरदार होता की ५-६ गाड्यांचा चक्काचूर झाला.
नवी दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांच्या मते, सोमवारी संध्याकाळी ६:५२ वाजता हळू चालणाऱ्या इको कारमध्ये स्फोट झाला. ही गाडी रेड लाईटकडे जात होती. यात आजूबाजूच्या गाड्याही सापडल्या.
दिल्ली पोलीस आयुक्तांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलून घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे. तर, पंतप्रधान मोदींनीही शाह यांच्याकडून फोनवर या प्रकरणाची माहिती घेतली आहे.
LNJP रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांच्या मते, स्फोटात जखमी झालेल्या १५ जणांना रुग्णालयात आणले, त्यापैकी ८ जणांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला. तीन जण गंभीर जखमी आहेत.
मेट्रो स्टेशनजवळ राहणाऱ्या एका दुकानदाराच्या मते, 'मी माझ्या आयुष्यात इतका मोठा स्फोट कधीच ऐकला नाही. स्फोटामुळे मी तीन वेळा खाली पडलो. आमच्यापैकी कोणीही वाचणार नाही असे वाटले.'
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, त्यांच्या घरात मोठ्या स्फोटाचा आवाज आला. घराच्या खिडक्या हादरल्या. बाहेर येऊन पाहिलं तर आगीच्या ज्वाला आणि धूर दिसत होता.
लाल किल्ल्याजवळ झालेल्या या स्फोटामुळे सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली आहे. हा स्फोट अशा वेळी झाला आहे, जेव्हा सोमवारीच दिल्लीजवळच्या फरिदाबादमध्ये २९०० किलो अमोनियम नायट्रेट सापडले.

