Modi Sarkar Campaign : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोदी सरकारचे 24 भाषांमधील गाणे लाँच

| Published : Feb 19 2024, 12:05 PM IST / Updated: Feb 19 2024, 12:07 PM IST

mandapam

सार

भारत मंडपम येथे आयोजित करम्यात आलेल्या भाजपच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत पुन्हा एकदा मोदी सरकारच्या कॅम्पेनची सुरुवात करण्यात आली. या दरम्यान, कॅम्पेनसंदर्भातील गाणे लाँच करण्यात आले आहे.

Modi Sarkar : भारत मंडमपमध्ये भाजपच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुन्हा एकदा मोदी सरकारने आपल्या कॅम्पेनची सुरुवात करण्यासह एक गाणे लाँच केले आहे. भाजपकडून 24 भाषांमध्ये गाणे लाँच करण्यात आले आहे.

खरंतर गाणे आगामी लोकसभा निवडणुकीवेळी वापरले जाणार आहे. या गाणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पैलुंवर प्रकाश टाकण्यात आला आहे. याशिवाय गाण्यात शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेली कामे, महिला, तरुण, देशातील अभूतपूर्व पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकास, चांद्रयान- 3 मिशनसह राम मंदिराबद्दच्या गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

या भाषांमध्ये लाँच करण्यात आलेय गाणे
हिंदी, सिंधी, डोगरी, बंदुली, हरियाणवी, गारो, आसामी, उडिया, संथाली, भोजपुरी, पंजाबी, गुजराती, तमिळ, कश्मीरी, नागा, संस्कृत, कन्नड, कुमाऊनी, बंगाली, मारवाडी, इंग्रजी, तेलुगु, मराठी आणि मल्याळम.

आणखी वाचा : 

Farmers Protest : शेतकऱ्यांचे आंदोलन दोन दिवस स्थगित, सरकारने MSP संदर्भात दिला महत्त्वाचा निर्णय

'मी अमित शाह बोलतोय...' माजी आमदाराला फोन करत निवडणुकीच्या तिकिटासाठी केली पैशांची मागणी, वाचा पुढे काय घडले

Sonia Gandhi Shifts To Rajya Sabha : सोनिया गांधींकडून राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज दाखल