Delhi : स्पामध्ये बंद होणार नाही 'क्रॉस-जेंडर' मसाज, उच्च न्यायालयाने या कारणास्तव फेटाळली याचिका

| Published : Apr 05 2024, 08:33 AM IST / Updated: Apr 05 2024, 08:36 AM IST

Body Messages

सार

दिल्ली उच्च न्यायालयाने स्पा सेंटर्समध्ये क्रॉस-जेंडर मसाजवर बंदी घालण्यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली आहे. क्रॉस जेंडर मसाजमध्ये महिलांकडून पुरुषाची आणि पुरुष मंडळी महिलांचे मसाज करतात.

Delhi : दिल्ली उच्च न्यायालयाने स्पा आणि मसाज सेंटर्समध्ये ‘क्रॉस-जेंडर’ मसाजवर (Cross Gender Massage) बंदी घालण्यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली आहे. क्रॉस जेंडर मसाज म्हणजे जेथे महिलांकडून पुरुष आणि पुरुषांकडून महिलांचे मसाज केले जाते.

 याचिका फेटाळून लावत उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने म्हटले की, न्यायालयाच्या एका न्यायाधीशांकडे हे प्रकरण आधीपासूनच आहे. ज्यामध्ये दिल्ली सरकारकडून दिल्लीतील स्पा, मसाज पार्लर चालवण्यासंदर्भातील गाइडलाइन्स 18 ऑगस्ट, 2021 रोजीच देण्यात आल्या होत्या. यालाच आव्हान देण्यात आल्याने आम्ही यावर विचार करू शकत नाही.

या प्रकरणावर सुनावणीदरम्यान प्रभारी मुख्य न्यायाधीश मनमोहन आणि न्यायाशीध मनमीत पीएस अरोरा यांच्या खंडपीठाने म्हटले की, हे प्रकरण आधीच एक न्यायाधीश पाहत आहेत. या कोर्टाचा असा विचार आहे की, सध्या क्रॉस-जेंडर मसाजवर बंदी घालण्याच्या याचिकेवर विचार केला जाऊ शकत नाही. यामुळेच याचिका फेटाळली आहे.

ऑडिओ-व्हिडीओची मागणी केली होती
फेटाळून लावलेल्या याचिकेवर याचिकाकर्त्यांनी कोर्टाला अधिकाऱ्यांना स्पा आणि मसाज सेंटरचे ऑडिओ आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग नियमितपणे दिल्ली महिला आयोगासोबत (Women's Commission) शेअर करण्याचा आग्रही केला होता.

याचिकाकर्त्यांच्या वकीलांनी म्हटले होते की, दिल्ली सरकारकडून 18 ऑगस्ट, 2021 रोजी जारी करण्यात आलेल्या गाइडलाइनचे थेट उल्लंघन करत राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात क्रॉस-जेंडर मसाज सेंटर चालवले जात आहे. याशिवाय बंद खोलीत नक्की मसाज केला जातोय की काही वेगळ्या गोष्टी केल्या जातायत असा दावाही करण्यात आला होता.

पोलीस तक्रार करूनही काही होत नाही
याचिकाकर्त्यांच्या वकीलांनी असेही म्हटले की, त्यांनी करोल बाग येथील एक स्पा बेकायदेशीरपणे चालवला जात होता. यासंबंधित पोलीस तक्रार केली तरीही काही कार्यवाही करण्यात आली नाही.

दुसऱ्या बाजूला एकल न्यायाधीश खंडपीठाने डिसेंबर, 2021 मध्ये दिल्ली महापालिका आणि दिल्ली पोलिसांना वेळोवेळी स्पाचे निरिक्षण करणे आणि आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. जेणेकरून परवानाशिवाय कोणताही स्पा चालवला जाणार नाही.

आणखी वाचा : 

अरविंद केजरीवाल यांची लकी कार कुठेय? जी AAP पक्षासाठी शुभ होती

'संदेशखळीतील दोषींना तुरुंगात आयुष्य घालवावे लागेल...' पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा TMC वर हल्लाबोल

फुलांनी नव्हे चिप्स-कुरकुरेच्या पाकिटांनी सजवलेली कार पोहोचली लग्न मंडपात, सोशल मीडियावर VIDEO व्हायरल