एक काळ असा होता, अरविंद केजरीवाल यांची निळ्या रंगातील वॅगनआर कार नेहमीच बातम्यांमध्ये चर्चेत असायची. केजरीवाल यांनी याच कारमध्ये बसून आपला राजकीय प्रवास सुरू केला होता.
अरविंद केजरीवाल पहिल्यांदा 49 दिवसांसाठी मुख्यमंत्री झाले असता त्यावेळी त्यांनी शासकीय गाडीसाठी नकार दिला होता. ते आपल्या वॅगनआर कारमधूनच प्रवास करायचे.
अरविंद केजरीवाल यांना आम आदमी पक्षाने वर्ष 2013 मध्ये भेट म्हणून दिली होती. याच्या माध्यमातूनच प्रवास करत केजरीवाल यांनी पहिली निवडणूक लढवली होती.
वर्ष 2015 मध्ये कुंदन शर्मा यांनी केजरीवाल यांना भेट दिलेली वॅगनआर परत मागितली होती. त्यावेळी या कारची जोरदार चर्चा झाली होती.
केजरीवाल यांची निळ्या रंगातील वॅगनआर दिल्ली सचिवालयाच्या पार्किंगमधून चोरी झाली होती. यानंतर कार गाझियाबाद येथे सापडली होती. सध्या केजरीवाल नव्या कारमधून प्रवास करतात.
केजरीवाल यांनी वॅगनआर रोहतक येथील लोकसभेच्या जागेवरील उमेदवार नवीन जयहिंद यांना दिली होती. त्यानंतर कार दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाति मालिवाल यांच्या निवासस्थानी दिसली.
गेल्या काही काळापासून केजरीवाल यांची वॅगनआर कार दिसत नाहीये. पक्षातील समर्थक कारला आजही लकी आणि शुभ मानतात.