सार

लग्नसोहळ्यासाठी वधूला आपल्या घरी नेण्यासाठी फुलांनी सजवलेली गाडी वराकडून आणली जाते. पण सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भर मंडपार्यंत चिप्स-कुरकुरेची पाकीट लावलेली गाडी पोहोचल्याचे दिसून येत आहे.

Viral Video : लग्नसोहळ्यावेळी धावपळ गोंधळ, पाहुण्यांची वर्दळ अशा सर्वच गोष्टी असतात. पण लग्नसोहळ्यावेळी नववधू आणि वर फार उत्साही असल्याचे दिसून येतात. अशातच भारतात विवाह करण्याच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. याचे व्हिडीओही कधीकधी सोशल मीडियावर व्हायरल होतात. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका वराने फुलांनी सजवलेली गाडी लग्नमंडपात आणण्याएवजी चक्क चिप्स-कुरकुरेच्या पाकिटांनी गाडी सजवली आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर सतपाल यादव नावाच्या एका युजरने व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये वराने आपल्या गाडीला चिप्स-कुरकुरेची पाकीट लावून सजवली आहे. खरंतर, चिप्सने सजवलेली गाडी पाहून लग्नासाठी आलेली वऱ्हाडीही चक्रावली आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओला 1.7 दशलक्षहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. याशिवाय व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

View post on Instagram
 

नेटकऱ्यांनी दिल्यात अशा प्रतिक्रिया
एका युजरने म्हटले की, चिप्सच्या पाकिटांनी सजवलेल्या कारच्या बाजूलाच उभी राहिली असती. दुसऱ्या युजरने म्हटलेय की, चिप्स विक्री करण्याची ही कोणती पद्धत आहे भाऊ?, तिसऱ्या युजरने म्हटले की, मी सुद्धा माझ्या भावासाठी असेच कारला डेकोरेशन करणार. अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत.

आणखी वाचा : 

Gold Prize : गुढी पाडव्याआधीच सोने जाणार ७२ हजारांवर !

अक्षय पात्र फाउंडेशनने आतापर्यंत 4 अब्ज लोकांना पुरवले अन्न, संयुक्त राष्ट्राने केली इस्कॉनची स्तुती

FASTag:आता एका वाहनासाठी एकच फास्ट टॅग, देशभरात ‘एक वाहन एकच फास्टॅग’