सार

समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरून आपले मत व्यक्त केले आहे. अरविंद केजरीवाल आणि अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकासाठी दिल्लीमध्ये आंदोलन केले होते.

समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरून आपले मत व्यक्त केले आहे. अरविंद केजरीवाल आणि अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकासाठी दिल्लीमध्ये आंदोलन केले होते. त्यानंतर अरविंद केजरीवाल संपूर्ण देशामध्ये चर्चेत आले होते. अरविंद केरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री झाले आणि पंजाब राज्यात त्यांच्या आम आदमी पक्षाची सत्ता आली. 

अण्णा हजारे अरविंद केजरीवाल यांच्याबाबत काय म्हणाले? 
अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्याबाबत बोलताना समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपले मत व्यक्त केले. त्यांनी सांगितलं की, “अरविंद केजरीवाल यांनी माझ्यासोबत काम केले. कधीकाळी आम्ही दारूच्या विरोधात आंदोलन केले होते. त्याच दारूच्या धोरणांबाबत आता त्यांना अटक करण्यात आली आहे. हे ऐकून मला खूप दुःख झाले.” 

पण सत्तेच्या पुढे कोणाचेच चालत नाही, असेही अण्णा हजारे यांनी पुढे म्हटले. अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. हे त्यांच्या चुकीमुळे झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. आता न्यायालयाच्या पातळीवर जे होईल ते दिसून येईल आणि पुढील कारवाईबाबत सरकारच ठरवेल, असे समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुढे म्हटले आहे. अरविंद केजरीवाल यांचे लोकपाल आंदोलनाच्या काळातील इतर साथीदार काय रिप्लाय देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 
आणखी वाचा - 
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची जागा कोण घेणार? या दिग्गज नेत्यावर जबाबदारी येण्याची शक्यता
PM Narendra Modi Bhutan Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय भूतानमध्ये दाखल, PM शेरिंग तोबगे यांनी केले स्वागत