सार

ईडीने गुरुवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. अशातच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केंद्र सरकावर हल्लाबोल केला आहे.

Lok Sabha Election 2024 :  लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांना अटक केल्याने आम आदमी पक्षाला (Aam Admi Party) मोठा झटका बसला आहे. अशातच लोकसभा निवडणुकीची जबाबदारी कोणावर येणार या चर्चांना वेग आला आहे. निवडणूक प्रचाराच्या जबाबदारीसाठी भगवंत मान (Bhagwant Mann), आतिशी (Atishi Marlena) आणि सौरभ भारद्वाज (Saurabh Bhardwaj) यांच्यावर येण्याची शक्यता आहे. आप खासदार राघव चड्ढा डोळ्यांची शस्रक्रिया करण्यासाठी ब्रिटेनमध्ये दाखल झाले आहेत. अशातच राघव चड्ढा (Raghav Chadha) पंजाबमधील निवडणूक प्रचाराला उपस्थितीत राहण्याची शक्यता फार कमी आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीवेळी पंजाबच्या प्रचार रॅलीची जबाबदारी राघव चड्ढा यांच्यावर सोपवण्यात आली होती. याशिवाय चड्ढा यांच्या प्रचारामुळे पक्षाचा विजयही झाला होता. अशातच पंजाबमधील बड्या चेहऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास, मुख्यमंत्री भगवंत मान आहेत.

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर भगवंत मान यांची प्रतिक्रिया
मद्य धोरणाच्या घोटाळ्यासंबंधित ईडीकडून (ED) दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर भगवंत मान यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. ईडीच्या कार्यप्रणालीवर भगवंत मान यांनी प्रश्न उपस्थितीत करत म्हटले की, ईडी भाजपाचीच (BJP) राजकीय टीम आहे. भाजप केजरीवाल यांच्या विचारसरणीला कैद करू शकत नाही. कारण आम आदमी पक्षच भाजपलाच रोखू शकते.

पुढील पाच दिवसात उर्वरित पाच उमेदवारांची घोषणा करतील
मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटले की, पुढील पाच दिवसात राज्यातील उर्वरित पाच लोकसभा जागांसाठी उमेदवारांची घोषणा करणार आहोत. भगवंत मान यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर ट्विट करत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाणार असल्याची माहिती दिली आहे. याआधी आम आदमी पक्षाने आठ जागांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती.

पंजाब आणि चंदीगडमधील 14 जागांवर एकट्याने निवडणूक लढवणार पक्ष
आम आदमी पक्ष पंजाब आणि चंदीगड येथील 14 जागांवर एकट्याने निवडणूक लढवणार आहे. पंजाबमध्ये पक्ष इंडिया आघाडीशिवाय एकट्याने निवडणूक लढवणार आहे. दिल्लीतील लोकसभेच्या जागेवरून आम आदमी पक्षाने अधिकाधिका आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. खरंतर, काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने सहमतीने एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा : 

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राजीनामा द्यावा लागणार की तुरुंगातून चालवणार सरकार?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक, PMLA कायद्याअंतर्गत जामीन मिळणे का कठीण जाणून घ्या

Lok Sabha Election 2024 : 'काँग्रेसने पराभवाच्या भीतीपोटी इन्कम टॅक्स कार्यवाही विरोधात बोलावली पत्रकार परिषद', जेपी नड्डा यांनी केला हल्लाबोल