सार

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस भूतान दौऱ्यावर असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानमध्ये दाखल झाल्यानंतर पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी त्यांचे स्वागत केले.

PM Narendra Modi Bhutan Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांचा भूतान दौरा करणार असून त्यासाठी शुक्रवारी (22 मार्च) सकाळीच रवाना झाल्यानंतर तेथे पोहोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 आणि 23 मार्चला भूतान दौरा करणार आहेत. खरंतर, दौऱ्याच्या एक दिवसआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भूतानचा दौरा तेथील वातावरणात बिघडल्याने रद्द झाला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार भूतानच्या पंतप्रधानांची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे (Bhutan PM Tshering Tobgay) यांनी राज्याचा दौरा करण्याचे निमंत्रण पाठवले होते. याआधी भूतानचे पंतप्रधान पाच दिवसांसाठी 14 ते 18 मार्च दरम्यान भारतात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भूतानच्या पंतप्रधानांनी त्यांच्या राज्यात भेट देण्याचे निमंत्रण दिले होते. जानेवारी महिन्यात पंतप्रधान झाल्यानंतर शेरिंग तोबगे यांचा पहिलाच परदेश दौरा होता. दौऱ्यावेळी तोबगे यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. याशिवाय काही कार्यक्रमांमध्येही तोबगे यांनी उपस्थिती लावली होती.

 

 

भूतानचा सर्वाधिक मोठा मित्रदेश आहे भारत
ऐतिहासिक रुपात भूतानचे नेहमीच भूतानसोबत उत्तम नातेसंबंध राहिले आहेत. आठ लाख लोकसंख्या असलेल्या भूतानचे अलिप्ततावादी धोरण आहे. भूतानचे अमेरिका, चीन, ब्रिटन, फ्रान्स आणि रशियासोबत राजकीय संबंध नाहीत. वर्ष 1949 मध्ये भारत-भूतानमध्ये परराष्ट्र धोरण, व्यापार आणि सुरक्षा यासंबंधीचा करार झाला होता. वर्ष 2007 मध्ये परराष्ट्र धोरणाची तरतूद हटवण्यात आली होती. भारत आता भूतानचा सर्वाधिक मोठा राजकीय आणि आर्थिक मित्रदेश आहे.

आणखी वाचा : 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक, PMLA कायद्याअंतर्गत जामीन मिळणे का कठीण जाणून घ्या

Lok Sabha Election 2024 : 'काँग्रेसने पराभवाच्या भीतीपोटी इन्कम टॅक्स कार्यवाही विरोधात बोलावली पत्रकार परिषद', जेपी नड्डा यांनी केला हल्लाबोल

Lok Sabha Election 2024 : अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय नागरिकांना लोकसभा निवडणुकीत मतदान करता येणार? जाणून घ्या नियम