सार

बायजूस या शैक्षणिक अ‍ॅपचे संस्थापक आणि सीईओ रवींद्रन यांच्या अडचणीत वाढ होत चालली आहे. नुकत्याच अंमलबजावणी संचालनालयाने ब्युरो ऑफ इमिग्रेशन यांच्याकडून रवींद्रन यांच्या विरोधात लुक आऊट नोटीस जारी केली आहे. 

Byjus Raveendran Lookout Circular : गेल्या काही महिन्यांपासून शैक्षणिक अ‍ॅपच्या अडचणीत दिवसागणिक वाढ होत चालली आहे. नुकत्याच अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ब्युरो ऑफ इमिग्रेशन यांच्याकडून बायजूसचे संस्थापक आणि सीईओ रवींद्रन यांच्या विरोधात लुक आऊट नोटीस जारी केली आहे. रिपोर्ट्सनुसार, ईडी लुक आऊट नोटीस अशा कारणास्तव जारी करते जेणेकरून व्यक्ती देश सोडून बाहेर जाऊ नये. गेल्या काही वर्षांमध्ये रवींद्रन यांनी दिल्ली आणि दुबईदरम्यान खूप प्रवास केला आहे.

FEMA अंतर्गत बायजूसचा ईडीकडून तपास
ईडीचे बंगळूरु कार्यालय सध्या बायजूसच्या विरोधात परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे (फेमा) उल्लंघन केल्याअंतर्गत तपास करत आहे. ईडीने रवींद्रन यांच्यावर देश सोडण्यासाठी बंदी घालण्यासाठी लुक आऊट नोटीस जारी केली आहे. दरम्यान, गेल्या तीन महिन्यांआधी नोव्हेंबर, 2023 मध्ये ईडीने रवींद्रन आणि त्यांची मूळ कंपनी थिंक अ‍ॅण्ड लर्न प्रायव्हेट लिमिटेडला 9,362 कोटी रुपयांची नोटीस जारी केली होती.

बायजूसने कायद्याकडे कानाडोळा करत परदेशात केली गुंतवणूक
ईडीच्या मते, बायजूसने भारताबाहेर गुंतवणूक केली होती, जी कथित रुपात फेमाच्या 1999 च्या तरतुदींचे उल्लंघन आहे. यामुळे भारत सरकारच्या महसूलाचे फार मोठे नुकसान झाले होते. हेच कारण आहे की, ईडी फेमा कायद्याअंतर्गत तपास करत आहे.

लुक आऊट नोटीस म्हणजे काय?
लुक आऊट नोटीसचा वापर आंतरराष्ट्रीय विमानतळ, बंदर सारख्या आंतरराष्ट्रीय सीमांवर प्रवास करणाऱ्या व्यक्तींच्या तपासाठी जारी केली जाते. याचा अर्थ असा होतो की, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना खात्री पटवून घ्यायची असते की, प्रवास करणारा व्यक्ती पोलिसांद्वारे वॉन्टेड आहे की नाही.

कधी जारी केली जाते लुक आऊट नोटीस?
लुक आऊट नोटीस अशावेळी जारी केली जाते ज्यावेळी एखादा आरोपी कायद्याच्या कचाट्यातून पळ काढण्याचा प्रयत्न करतो अथवा त्याच्यावर संशय असतो की, तो फरार होऊ शकतो. भारतात लुक आऊट नोटीस गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या गाइडलाइन्सनुसार जारी केली जाते.

आणखी वाचा : 

'PM मोदी का मतलब राम, वो एक अवतार है', बनास डेअरी काशी संकुलाच्या उद्घाटनानिमित्त शेतकऱ्यांनी पंतप्रधानांचे केले कौतुक (Watch Video)

IPL 2024 Schedule : 'आयपीएल' चा आगामी हंगाम येत्या 22 मार्चपासून, येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोदी सरकारचा दिलासा, खरेदी दरात वाढ केल्यानंतर पंतप्रधानांनी दिली अशी प्रतिक्रिया