सार

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएल दोन टप्प्यात खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात 21 सामने खेळवले जाणार आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा होणार आहे. हा सामना चैन्नईत खेळवला जाणार आहे.

IPL 2024 Schedule : क्रिकेट प्रेमींसाठी आयपीएलसंदर्भात एक आनंदाची बातमी आहे. इंडियन प्रीमियअर लीग म्हणजेच आयपीएल 2024 चे वेळापत्रक नुकतेच बीसीसीआयने (BCCI) जारी केले आहे. येत्या 22 मार्च पासून आयपीएलचा शुभारंभ होणार आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) पाहता आयपीएल दोन टप्प्यात खेळवली जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात 21 सामने होणार आहेत. पहिला सामना चैन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु यांचामध्ये होणार आहे. हा सामना चेन्नईत खेळवला जाणार आहे.

आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील 21 सामने येत्या 22 मार्च ते 7 एप्रिल, 2024 दरम्यान खेळवले जाणार आहेत. सर्व 21 सामने 10 शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. पहिला सामना चैन्नईत रात्री 8 वाजता खेळवला जाणार आहे. तर अन्य सामने दुपारी 3.30 किंवा संध्याकाळी 7.30 वाजता खेळवले जाणार आहेत. आयपीएलमध्ये 74 सामने खेळवले जाणार आहेत. पण दुसऱ्या टप्प्यात उर्वरित सामने पार पडणार आहेत.

आयपीएल 2024 चे वेळापत्रक

  • चेन्नई सुपर किंग्स Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु, 22 मार्च, चैन्नई, रात्री 8.00 वाजता
  • पंजाब किंग्स Vs दिल्ली कॅपिटल्स, 22 मार्च, मोहाली, दुपारी 3.30 वाजता
  • कोलकाता नाइट राइडर्स Vs सनराइज हैदराबाद, 23 मार्च, कोलकाता संध्याकाळी 7.30 वाजता
  • राजस्थान रॉयल्स Vs लखनऊ सुपर जाएंट्स, 24 मार्च, जयपुर, दुपारी 3.30 वाजता
  • गुजरात टायटन्स Vs मुंबई इंडियन्स, 24 मार्च, अहमदाबाद, संध्याकाळी 7.30 मिनिटांनी
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु Vs पंजाब किंग्स, 25 मार्च,बंगळूरु, संध्याकाळी 7.30 वाजता
  • चेन्नई सुपर किंग्स Vs गुजरात टायटन्स, 26 मार्च, चेन्नई, संध्याकाळी 7.30 वाजता
  • राजस्थान रॉयल्स Vs दिल्ली कॅपिटल्स, 28 मार्च, जयपुर, संध्याकाळी 7.30 वाजता
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु Vs कोलकाता नाइट राइडर्स, 29 मार्च, बंगळूरु, संध्याकाळी 7.30 वाजता
  • लखनऊ सुपर जाएंट्स Vs पंजाब किंग्स, 30 मार्च, लखनऊ, संध्याकाळी 7.30 वाजता
  • गुजरात टायटन्स Vs सनराइजर्स हैदराबाद, 31 मार्च, विशाखापट्टणम, दुपारी 3.30 वाजता
  • दिल्ली कॅपिटल्स Vs चेन्नई सुपर किंग्स, 31 मार्च, विशाखापट्टणम, संध्याकाळी 7.30 वाजता
  • मुंबई इंडियन्स Vs राजस्थान रॉयल्स, 1 एप्रिल, संध्यकाळी 7.30 वाजता
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु Vs लखनऊ सुपर जाएंट्स, 2 एप्रिल, बंगळूरु, संध्याकाळी 7.30 वाजता
  • दिल्ली कॅपिटल्स Vs कोलकाता नाइट राइडर्स, 3 एप्रिल, विशाखापट्टणम, संध्याकाळी 7.30 वाजता
  • गुजरात टायटन्स Vs पंजाब किंग्स, 4 एप्रिल, अहमदाबाद, संध्याकाळी 7.30 वाजता
  • सनराइजर्स हैदराबाद Vs चेन्नई सुपर किंग्स, 5 एप्रिल, हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजता
  • राजस्थान रॉयल्स Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु, जयपुर, संध्याकाळी 7.30 वाजता
  • मुंबई इंडियन्स Vs दिल्ली कॅपिटल्स, 7 एप्रिल, दुपारी 3.30 वाजता
  • लखनऊ सुपर जाएंट्स Vs गुजरात टाइटन्स, 7 एप्रिल, लखनऊ, संध्याकाळी 7.30 वाजता

आणखी वाचा : 

मुकेश आणि नीता अंबानी यांनी सून राधिकाला लग्नाआधी दिले हे महागडे गिफ्ट, किंमत ऐकून व्हाल थक्क

जिलेबी तळण्याची ही पद्धत पाहून व्हाल अव्वाक, आनंद महिंद्रांनी शेअर केला VIDEO

कर्नाटकातील मंदिरांकडून वसूल केला जाणार 10 टक्के टॅक्स, काँग्रेस सरकारच्या निर्णयानंतर BJP ने दिली संतप्त प्रतिक्रिया