सार
शेतकऱ्यांकडून गेल्या काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी आंदोलन केले जात आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक विधान केले आहे.
Sugarcane Procurement Price Hike : पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी पिकांसाठी किमान आधारभूत किंमतीसंदर्भातील (MSP) कायदा आणि अन्य मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. अशातच सरकारने आंदोलक शेतकऱ्यांना दिलासा देत ऊस खरेदीवर ऐतिहासिक निर्णय दिला आहे. यावरच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत म्हटले की, “आमचे सरकार देशातील शेतकऱ्यांच्या कल्याणासंदर्भातील प्रत्येक संकल्प पूर्ण करेल. अशातच ऊस खरेदी किंमतीच्या ऐतिहासिक वाढीला मंजूरी देण्यात आली आहे. यामुळे देशातील कोट्यावधी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.”
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला निर्णय
बुधवारी (21 फेब्रुवारी) केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत ऊस खरेदी किंमतीत आठ टक्क्यांनी वाढ करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. मोदी सरकारने ऊस खरेदी किंमत 315 रुपये प्रति क्विंटलवरुन 340 रुपये प्रति क्विंटल रुपये केले आहे.
या निर्णयामुळे ऊसाच्या किंमतीत 25 रुपये प्रति क्विंटलने वाढ झाली आहे. यावर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले की, मोदी सरकारने नेहमीच शेतकऱ्यांसाठी काम केलेय आणि पुढेही करत राहिल.
आणखी वाचा :
शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा मारा केल्याने AIMIM नेते असदुद्दीन ओवैसी यांचा भाजपवर हल्लाबोल, म्हणाले....
चंदीगड महापौर निवडणुकीसंदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, पुन्हा मतमोजणी करण्याचे आदेश