सार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्याच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी काशी संसद संस्कृत स्पर्धेच्या पारितोषित वितरण समारंभाला उपस्थिती लावली. यानंतर पंतप्रधानांनी वाराणसी येथील अमूल बनास डेअरी प्लांटची पाहणी केली.
PM Modi Visit UP : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (23 फेब्रुवारी) वाराणसी (Varanasi) दौऱ्यावर असून काही कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी करखियांव येथील UPSIDA अॅग्रो पार्कातील बनासकांठा जिल्हा सहकारी दुग्ध उत्पादक संघ लिमिटेडच्या दूध प्रक्रिया युनिट बनास काशी संकुलचा दौरा करणार आहेत.
या कार्यक्रमानिमित्त पंतप्रधानांना पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली आहे. याशिवाय नागरिकांनी म्हटले की, "त्यांच्यासारखे काम आजवर उत्तर प्रदेशात कोणत्या नेत्याने केलेले नाही. त्यांच्यासारखा दुसरा नेता नाही." यासंदर्भातच एका व्यक्तीने म्हटले की, “ते राम आहेत, ते एक अवतार आहेत.”
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज वाराणसी दौऱ्याच्या सुरुवातीला सर्वप्रथम काशी संसद संस्कृत स्पर्धेच्या पारितोषित वितरण समारंभाला उपस्थिती लावली. यानंतर संत गुरु रविदास यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. याशिवाय उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत संत रविदास यांच्या 47 व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
आणखी वाचा :
Narendra Modi : अमूलच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लावली हजेरी