सार
Union Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून मोदी सरकारमधील 3.0 अर्थसंकल्प सादर केला जात आहे. या अर्थसंकल्पात कोणत्या वस्तू स्वस्त आणि कोणत्या वस्तू महाग झाल्यात याची घोषणा करण्यात आली आहे. याचीच संपूर्ण यादी पाहूयात सविस्तर…
Budget 2024 Cheaper and Costlier Items List : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळातील तिसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून 23 जुलैला संसदेत सादर करण्यात आला. सातव्यांदा निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पात वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी काही मोठ्या घोषणा करण्यात आला आहेत. अशातच कोणत्या गोष्टी महाग झाल्याने सर्वसामान्य व्यक्तीच्या खिशाला कात्री बसणार तर कोणत्या गोष्टी स्वस्त झाल्यात याचीही घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली आहे. याशिवाय केंद्र सरकारकडून काही नव्या वस्तूंवरील सीमा शुल्कांमध्ये घट करण्यात आली आहे. यामध्ये कॅन्सरच्या आजारावरील औषधांवरील शुक्ल माफ केला आहे. जाणून घेऊया कोणत्या गोष्टी महाग झाल्यात आणि कोणत्या स्वस्त याची संपूर्ण यादी सविस्तर....
देशात तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणे ऐतिसाहिक बाब- अर्थमंत्री
मोदी सरकारच्या कार्यकाळातील तिसरा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा देशात सत्ता स्थापन होणे ऐतिहासिक बाब आहे. देशाच्या जनतेने सरकारवर विश्वास दाखवला आहे. जागतिक स्थितीचा महागाईवर परिणाम होत असला तरीही भारतातील महागाी दर 4 टक्क्यांपर्यंत आहे. दरम्यान, निर्मला सीतारमण यांनी म्हटले की, आम्ही अर्थसंकल्पात गरीब, महिला, तरुण आणि कृषी क्षेत्रावर लक्ष दिले आहे. अर्थमंत्र्यांनी म्हटले की, अर्थव्यवस्थेला सातत्याने चालना मिळत आहे. या अर्थसंकल्पात 9 प्राथमिक गोष्टींवर लक्षही दिले आहे.
सोन्या-चांदीच्या दरात येईल घट
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोठी घोषणा करत म्हटले की, कॅन्सरची औषधे स्वस्त होणार आहेत. मोबाइल आणि मोबाइल चार्जरसह अन्य उपकरणांवर BCD 15 टक्के कमी झाली आहे. याशिवाय सरकारने सोने आण चांदीवर सीमा शुक्ल कमी करत 6 टक्के केली आहे. यानंतर सोन्याचांदीच्या किंमती कमी होणार आहे. याशिवाय लेदर आणि फुटवेअरवर सीमा शुल्कही कमी करण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला टेलिकॉम उपकरणे महाग झाली आहेत. यावर लावण्यात आलेला सीमा शुल्क 15 टक्के केली आहे.
काय स्वस्त आणि काय महाग झाले?
- कॅन्सरच्या उपचारासाठी आणखी तीन औषधांवरील सीमा शुल्कात सूट
- मोबाइल फोन, चार्जरवरील सीमा शुल्कात घट
- एक्सरे ट्यूबवर सूट
- मोबाईल फोन, चार्जरवरील सीमा शुल्क 15 टक्के कमी
- 25 महत्वाच्या खनिजांवरील शुल्क रद्द
- फिश फीडवरील सीमा शुल्क रद्द
- देशात तयार होणारे चामडे, कपड आणि शूज स्वस्त
- प्लॅटीनमवर 6.4 टक्के सीमा शुल्कात घट
- सोन्या-चांदीवर 6 टक्के सीमा शुल्क घट
- प्लास्टिक सामानावर आयात शुल्कात वाढ
- पेट्रोकेमिकल-अमोनियम नाइट्रेटवरील सीमा शुल्कात वाढ
- पीवीसी फ्लॅक्स बॅनर स्वस्त
- विमान प्रवास महाग
- सिगरेटही महाग
निर्मला सीतारमण यांच्याकडून सातव्यांदा अर्थसंकल्प सादर
अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सातत्याने सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळीही निर्मला सीतारमण यांच्याकडून चालू आर्थिक वर्ष 2024-25 साठी पेपरलेस अर्थसंकल्प सादर करत आहेत. आताचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी निर्मला सीतारमण यांनी मजेंटा बॉर्डर असणारी क्रिम रंगातील साडी नेसली आहे. संसदेत अर्थसंकल्प सादर करण्याआधी निर्मला सीतारमण यांनी अधिकाऱ्यांच्या टीमसोबत पारंपारिक ब्रीफकेससाठी फोटोही काढले. टॅबला ब्रीफकेसएवजी एका लाल रंगातील कव्हरमध्ये ठेवले होते. यावर गोल्डन रंगातील राष्ट्रीय प्रतीक दिसून आले. राष्ट्रपती भवनात द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतल्यानंतर निर्मला सीतारमण थेट संसदेत पोहोचल्या.
आणखी वाचा :
Budget 2024 : अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा, A टू Z बजेट जाणून घ्या एकाच क्लिकवर
Budget 2024 : नोकरीसह महिला व गरिबांसाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा, वाचा सविस्तर