सार

Ameen Sayani : प्रसिद्ध निवेदक अमीन सयानी (Ameen Sayani) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. 

Ameen Sayani : ज्यांचा रेडिओवर आवाज ऐकण्यासाठी लोक आतुर असायचे त्यांचा आवाज कायमचा निःशब्द झाला आहे. प्रसिद्ध निवेदक अमीन सयानी (Ameen Sayani) यांचे बुधवार (21 फेब्रुवारी) रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. माहिती मिळाल्यानुसार, त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यावर लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अमीन सयानी हे 91 वर्षांचे होते आणि वृध्दापकाळाच्या आजाराने त्रस्त होते.

अमीन सयानी यांच्या मृत्यूची मुलाने दिली माहिती

अमीन सयानी (Ameen Sayani) यांचा मुलगा राजील सयानी याने वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे. हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) वडिलांचा मृत्यू झाला असे राजील सयानी यांनी सांगितल. बुधवार (20 फेब्रुवारी) अमीन सयानी यांचे निधन झाले. प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार अमीन सयानी यांना घरी असताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर तातडीने रुग्णालयात नेण्यात आले पण जाण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

अमीन सयानी यांचा ‘बिनाका गीतमाला’ प्रसिद्ध शो

प्रसिद्ध निवेदक म्हणून अमीन सयानी यांचा ‘बिनाका गीतमाला’ (Binaca Geetmala) हा शो प्रसिद्ध होता. हा कार्यक्रम सादर करण्याची त्यांची शैली आणि आवाज आजही लोकांच्या लक्षात आहे. या शोच्या माध्यमातून अमीन सयानी हे 1 ते 10 पर्यंत संपूर्ण आठवड्यातील टॉप गाणी प्रेक्षकांना ऐकवत असायचे. शोच्या दरम्यान ते अनेक किस्सेही सांगायचे.

 

 

अमीन सयानी यांनी चित्रपटात केले होते काम

फार कमी लोकांना हे माहित असेल की, अमीन सयानी यांनी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी भूत बंगला, तीन देवियां, बॉक्सर, कातिल यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. तसेच त्यांनी अनेक रेडिओ शोमध्ये (Radio Show) मध्ये देखील निवेदन केले होते.

आणखी वाचा : 
झिशान सिद्दीकीवर काँग्रेसची मोठी कारवाई, अखिलेश यादव यांना पक्षाने दिले यूथ काँग्रेसचे अध्यक्षपद
पोकलेन मशीन, मॉडिफाइड ट्रॅक्टर : ‘दिल्ली चलो’चा नारा देत शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत WATCH VIDEO
विद्या बालनच्या नावाखाली सोशल मीडियात नागरिकांची फसवणूक, अभिनेत्रीने दाखल केला FIR