सार

Farmers Protest 2024 : मोदी सरकारचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर आंदोलनकर्ते शेतकरी अधिक आक्रमक झाल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांनी पुन्हा 'दिल्ली चलो'चा नारा देत आंदोलनाची जोरदार तयारी सुरू केल्याचे दिसत आहे.

Farmers Protest 2024 : शेतकरी नेते आणि केंद्र सरकार यांच्यातील चर्चेच्या चार फेऱ्या निष्फळ ठरल्याने शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. संयुक्त किसान मोर्चाने पाच पिकांना पाच वर्षांसाठी जुन्या एमएसपीची हमी देण्याचा मोदी सरकारचा प्रस्ताव सोमवारी (19 फेब्रुवारी) फेटाळला. यानंतर आता आंदोलनकर्ते शेतकरी अधिक आक्रमक झाल्याचे दिसत आहे. 

शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा शंभू सीमेवर 'दिल्ली चलो'चा नारा देत आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. दरम्यान सोमवारी (19 फेब्रुवारी) संध्याकाळीच शेतकरी संघटना संयुक्त किसान आंदोलन (SKM) पुन्हा सुरू करण्याचा निर्णय देखील जाहीर केला होता.

यादरम्यान पंजाब-हरियाणा सीमेवर शंभू येथे हायड्रोलिक क्रेन, जेसीबी, पोकलेन मशिन, मॉडिफाइड ट्रॅक्टर यासारख्या अवजड वाहनांसह आंदोलन करताना शेतकरी हातात झेंडे घेऊन आणि जोरदार घोषणाबाजी करताना दिसले.

पुन्हा आंदोलन करण्यासाठी जोरदार तयारी

मागण्या मान्य न झाल्याने आंदोलनकर्ते शेतकरी अवजड वाहनांसह पुन्हा एकदा जोरदार आंदोलन करण्याच्या तयारीमध्ये आहेत. आंदोलनाच्या मार्गातील अडथळे मोडित काढण्यासाठी शेतकरी पोकलेन मशीनसह शंभू सीमेवर दाखल झाले आहेत. या अवजड वाहनांची झलक पाहण्यासाठी स्थानिक देखील मोठ्या प्रमाणात गर्दी करताहेत. 

अश्रुधुराच्या कांड्या, रबर गोळ्यांपासून संरक्षण व्हावे, यासाठी पोकलेन मशीनच्या केबिनला जाड स्वरुपातील लोखंडी पत्रे जोडण्यात आले आहेत. तसेच पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लावलेले बॅरिकेड्स तोडण्यासाठी ट्रॅक्टरमध्येही शेतकऱ्यांनी बदल केले आहेत. दुसरीकडे राजधानी नवी दिल्लीकडे कूच करण्यासाठी शेतकऱ्यांनी बुधवारी (21 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजेपर्यंतची वेळ निश्चित केली आहे.

सोमवारी चर्चेची चौथी फेरी ठरली निष्फळ

पुढील पाच वर्षांकरिता डाळी (Pulses), मका आणि कापूस (Cotton) पिकांची सरकारी संस्थांकडून किमान आधारभूत किमतीवर खरेदी करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने (Central Government) शेतकऱ्यांपुढे ठेवला. पण प्रस्ताव फेटाळून लावत 23 पिकांना हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली. 

याबाबत शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या प्रस्तावाचा शेतकऱ्यांना फायदा होणार नसल्याचे सांगितले आणि आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय देखील जाहीर केला. तसेच स्वामीनाथन आयोगाच्या (Swaminathan Commission) अहवालामध्ये शिफारस केल्याप्रमाणे एमएसपीसाठी (MSP) ‘सी-2 प्लस 50 टक्के’ फॉर्म्युल्यापेक्षा कमी असलेल्या कोणत्याही गोष्टीशी शेतकरी सहमत होणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

आणखी वाचा

Shri Kalki Dham Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते श्री कल्कि धाम मंदिराची पायाभरणी PHOTOS

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 : गडकोट-किल्ले हा आपला ठेवा, तो जपण्याचे काम करू - CM एकनाथ शिंदे

WATCH VIDEO : राहुल गांधींच्या यात्रेत सहभागी होण्यासाठी अखिलेश यादवांची मोठी अट, आता सपा INDIA आघाडीला देणार का धक्का?