सार
संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चा या दोन संघटनांनी या आंदोलकांच्या समर्थनार्थ 16 फेब्रुवारीला ग्रामीण भारत बंदची हाक दिली आहे.
Bharat Bandh 2024 : संयुक्त किसान मोर्चासह काही शेतकऱ्यांच्या संघटनांनी आज ग्रामीण भारत बंदची हाक दिली आहे. देशातील शेतकरी संघटनांनी केंद्रावर आपल्या मागण्यांवर दबाव टाकण्यासाठी भारत बंदचा निर्णय घेतला आहे.
आज ग्रामीण भारत बंदची हात सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4 वाजल्यापर्यंत असणार आहे. शुक्रवारी सार्वजनिक वाहतूक, कृषी क्षेत्र, खासगी कार्यालय, गावातील दुकाने आणि ग्रामीण औद्योगिक संस्था बंद राहण्याची अपेक्षा आहे.
भारत बंदची का देण्यात आलीय हाक?
पंजाबमधील शेकडो संख्येने शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघाले आहेत. यादरम्यान शेतकऱ्यांना जवळजवळ 200 किलोमीटर दूर अंबाला जवळ रोखण्यात आले आहे. याच कारणास्तव भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या संदर्भात दिल्ली पोलिसांच्या एका सूत्रांनी म्हटले की, आंदोलनकर्त्यांना दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखले जाणार आहे. अन्य काही रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आलाय की, आंदोलनावेळी आपत्कालीन सेवा, बोर्ड परिक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.
शेतकऱ्यांच्या काय आहेत मागण्या?
पिकांसाठी किमान आधारभूत किंमत देण्याचा कायदा तयार करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहेय. याशिवाय, आंदोलनातील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, वयाच्या 58 वर्षांवरील शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन योजना लागू करत प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपाय पेन्शन द्यावी.
आणखी वाचा :
रवींद्र जडेजावर वडिलांनी लावलेल्या आरोपांवर क्रिकेटरची पत्नी संतप्त, दिली अशी प्रतिक्रिया