MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • India
  • लिंगीपूर सुपरमार्केट आगीच्या भक्ष्यस्थानी, रोबोटिक सिस्टीमही फेल!

लिंगीपूर सुपरमार्केट आगीच्या भक्ष्यस्थानी, रोबोटिक सिस्टीमही फेल!

Bhubaneswar Lingipur Supermarket Fire Guts Building Despite Robotic Tech: भुवनेश्वरच्या लिंगीपूरमधील एका बहुमजली सुपरमार्केटला भीषण आग लागली. यात लाखो रुपयांची मालमत्ता जळून खाक झाली. घटनास्थळी ४० हून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. 

2 Min read
Author : Asianetnews Team Marathi
Published : Feb 24 2026, 05:27 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
भुवनेश्वरच्या लिंगीपूर सुपरमार्केटमध्ये भीषण आग, अनेक तासांनंतरही इमारत धगधगत होती
Image Credit : X@manas_muduli

भुवनेश्वरच्या लिंगीपूर सुपरमार्केटमध्ये भीषण आग, अनेक तासांनंतरही इमारत धगधगत होती

मिळालेल्या माहितीनुसार, ही आग इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर लागली. तिथे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि इतर ज्वलनशील सामान ठेवलं होतं. त्यामुळे आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केलं आणि ती वरच्या मजल्यांपर्यंत पसरली. आगीच्या धुराचे लोट दूरवरून दिसत होते, ज्यामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
तिसऱ्या मजल्यावरून आगीला सुरुवात, वेगाने वरपर्यंत पसरली
Image Credit : X@manas_muduli

तिसऱ्या मजल्यावरून आगीला सुरुवात, वेगाने वरपर्यंत पसरली

आग विझवण्यासाठी ४० हून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. पण परिस्थिती सोपी नव्हती. इमारतीत आत शिरण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना खूप अडचणी येत होत्या. दाट धूर आणि प्रचंड उष्णतेमुळे आत काम करणं कठीण झालं होतं. अनेक ठिकाणी आगीपर्यंत पोहोचण्यासाठी भिंती तोडाव्या लागल्या, जेणेकरून पाणी आणि फोम थेट आगीच्या ज्वाळांपर्यंत पोहोचू शकेल.

Related Articles

Related image1
Top Camera Phones: प्रीमियम बेस्ट कॅमेरा फोन्स आता तुमच्याही बजेटमध्ये
35
४० हून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या, भिंती तोडून टीम आत पोहोचली
Image Credit : X@manas_muduli

४० हून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या, भिंती तोडून टीम आत पोहोचली

परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन विभागाने अत्याधुनिक रोबोटिक मॉनिटरही आत पाठवला. यामागचा उद्देश होता की, कुणाचाही जीव धोक्यात न घालता आतून आगीवर नियंत्रण मिळवता येईल. पण आतलं तापमान खूप जास्त होतं आणि धूरही प्रचंड दाट होता. त्यामुळे हे तंत्रज्ञानही पूर्णपणे प्रभावी ठरू शकलं नाही.

45
रोबोटिक मॉनिटरही पूर्णपणे प्रभावी नाही
Image Credit : X@manas_muduli

रोबोटिक मॉनिटरही पूर्णपणे प्रभावी नाही

ओडिशा अग्निशमन सेवेचे डीजी सुधांशू सारंगी यांनी सांगितलं की, पहिल्या तीन मजल्यांवरील आगीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलं आहे. मात्र, चौथ्या मजल्यावर अजूनही मदत आणि बचावकार्य सुरू आहे. इथे रबर आणि प्लास्टिकसारखं साहित्य जास्त प्रमाणात आहे, जे लवकर पेट घेतं. त्यामुळे पाण्याऐवजी फोम केमिकलचा वापर केला जात आहे. अधिकाऱ्यांच्या मते, आग पूर्णपणे विझवण्यासाठी अजून वेळ लागू शकतो.

55
शॉर्ट सर्किटचा संशय, तपास सुरू
Image Credit : X@manas_muduli

शॉर्ट सर्किटचा संशय, तपास सुरू

आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. प्राथमिक अंदाजानुसार, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सुदैवाने, या घटनेत अद्याप कुणीही जखमी किंवा मृत झाल्याची बातमी नाही. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, मॉलमध्ये आत-बाहेर जाण्यासाठी फक्त एकच मार्ग होता. त्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना आणि जवानांना आत पोहोचायला वेळ लागला.

About the Author

AT
Asianetnews Team Marathi
भारताचे बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Jio Satellite Internet: अंबानींचा 1600 सॅटेलाइट लाँच करण्याचा मेगा प्लॅन
Recommended image2
Now Playing
ShivSena Split | आक्रमकता हरवल्याने शिवसेना 'उबाठा'वर वार | Uddhav Thackeray
Recommended image3
Now Playing
Ram Kadam यांचे शिवसेना UBT खासदारांवर भाष्य | MPs | Uddhav | OperationTiger
Recommended image4
Now Playing
Kishori Pednekar यांचे 6 खासदार गैरहजेरीवर भाष्य | MPs | Uddhav | ShivSenaUBT
Recommended image5
Now Playing
Sanjay Raut यांचे व्हीप न पाळणाऱ्यांवर कारवाईचे संकेत | Whip | MPs | ShivSena
Related Stories
Recommended image1
Top Camera Phones: प्रीमियम बेस्ट कॅमेरा फोन्स आता तुमच्याही बजेटमध्ये
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved