Ayodhya Ram Mandir : राम मंदिरात दर्शनाच्या वेळेत बदल, भाविकांची होणारी गर्दी पाहाता घेतला निर्णय

| Published : Jan 25 2024, 11:42 AM IST / Updated: Jan 25 2024, 11:46 AM IST

Ram Mandir, Ram Lalla idol

सार

राम मंदिरात रामललांचे दर्शन घेण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून तुफान गर्दी होत आहे. अशातच उत्तर प्रदेशातील पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळवणे मुश्किल होत आहे. यामुळे मंदिरात दर्शनासाठीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

Ayodhya Ram Mandir : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतर सर्वसामान्य भाविकांना रामललांचे दर्शन करता येत आहे. पण गेल्या दोन दिवसांपासून मंदिरात रामललांच्या दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी होत आहे. अशातच मंदिराच्या ट्रस्टकडून रामललांच्या दर्शनासाठी नवी वेळ ठरविण्यात आली आहे. यानुसारच आता भाविकांना दर्शन करता येणार आहे. रामललांचे दर्शन भाविकांना सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत घेता येणार आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडल्यानंतर 23 जानेवारीपासून मंदिर सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.

कडाक्याच्या थंडीतही भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी
उत्तर प्रदेशात कडाक्याची थंडी असूनही भाविक राम मंदिरात रामललांच्या दर्शनासाठी खूप गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे. काहीजण मध्यरात्री 2 वाजल्यापासून रामललांच्या दर्शनासाठी रांग लावण्यास सुरुवात करत आहेत. अशातत अयोध्येचे पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार यांनी म्हटले, मंदिरात भाविकांची गर्दी वाढताना दिसून येतेयं. यामुळे प्रवीण कुमार यांनी जेष्ठ नागरिक आणि अपंगांना काही दिवस रामललांच्या दर्शनासाठी येऊ नये असे आवाहनही केले होते.

अयोध्येत पार पडला रामललांच्या प्राणप्रतिष्ठेचा भव्य दिव्य सोहळा
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा नुकताच अयोध्येत पार पडला. यावेळी रामललांची गर्भगृहात विधिवत पूजा करत स्थापना करण्यात आली. प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी जवळजवळ आठ हजार जणांना निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आल्या होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामललांची प्राणप्रतिष्ठा झाली. प्राणप्रतिष्ठेवेळी गर्भगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath), राज्यपाल आनंदीबेन पटेल (Governor Anandiben Patel) व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुखे मोहन भागवत (Mohan Bhagwat) उपस्थितीत होते.

आणखी वाचा : 

Ram Mandir Pran Pratishtha : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील सुंदर क्षणांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून व्हिडीओ शेअर (Watch Video)

गुजरातच्या या व्यापाऱ्याने दिला रामललांना 11 कोटी रूपयांचा मुकूट

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कमळाच्या फुलानेच का केली रामललांची पूजा?

Read more Articles on