पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कमळाच्या फुलानेच का केली रामललांची पूजा?
22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी रामललांची विधिवत गर्भगृहात स्थापना करण्यात आली.
प्राणप्रतिष्ठेवेळी पंतप्रधानांनी संपूर्ण पूजेदरम्यान हातात कमळाचे फूल ठेवले होते. पण पूजेसाठी कमळाचेच का फूल वापरले गेले याबद्दल फार कमी जणांना माहितेय.
उज्जैनमधील ज्योतिषाचार्य पं. नलिन शर्मा यांच्यानुसार, हिंदू धर्मात कोणतेही काम फुलांशिवाय पूर्ण होत नाही. प्राणप्रतिष्ठेवेळीही फूल हातात ठेवण्याची प्रथा आहे.
प्राणप्रतिष्ठेदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हातात पूर्णवेळ कमळाचे फूल ठेवले होते. कारण कमळाच्या फुलाला हिंदू धर्मात सर्वाधिक महत्त्व असून ते अत्यंत पवित्र मानले जाते.
प्रभू श्रीरामांना कमळाचे फूल अत्यंत प्रिय आहे. या फुलाची उत्पत्ती भगवान विष्णूंच्या नाभीतून झाली होती. याशिवाय ब्रम्हेदव कमळाच्या फुलामधून प्रकट झाले होते.
भगवान विष्णूंची अनेक नावे कमळाच्या फुलावरुन आहेत. जसे की, कमलनयन, नलिन नयन, पंकज चरण, कमलाक्ष. भगवान विष्णूंचे डोळे हे कमळाच्या फुलांप्रमाणे असल्याचे मानले जाते.