गुजरातच्या या व्यापाऱ्याने दिला रामललांना 11 कोटी रूपयांचा मुकूट
रामललांना जो मुकूट घातलाय त्याची किंमत तब्बल 11 कोटी रूपये असल्याचे सांगितले जातेय.
गुजरातमधील सुरत येथील एका हिरे व्यापाऱ्याने अयोध्येतील रामलालांना 11 कोटी रूपयांचा सुंदर मुकूट दान केला आहे.
अत्यंत बारीक नक्षीकाम केलेल्या मुकूटाचे वजन सहा किलोग्रॅम आहे. मुकूट सोने, हिरे आणि मौल्यवान रत्नांचा वापर करुन तयार करण्यात आला आहे.
सुरतमधील ग्रीन लॅब डायमंड कंपनीचे प्रमुख मुकेश पटेल यांनी मंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांना सुंदर नक्षीकाम केलेला मुकूट भेट दिला आहे.
रामललांचा मुकूट भेट देण्यासाठी मुकेश पटेल आपल्या परिवारासोबत अयोध्येत आले होते.
प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यादरम्यान उद्योगपतींनी राम मंदिराचे मुख्य पुजारी आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या ट्रस्टींकडे मुकूट सोपवण्यात आला आहे.
मंदिर ट्रस्टनुसार, रामललांच्या मुर्तीचे आभूषणे रामायण, वाल्मिकी रामायण, रामचरितमानस आणि अलवंदर स्तोत्रम सारख्या ग्रंथांचा अभ्यास करुन तयार करण्यात आला आहे.
रामललांची आभूषणे लखनऊमधील हरसहायमल श्यामलाल ज्वेलर्सद्वारे तयार करण्यात आली आहेत.
रामललांच्या वस्रावर शंख, पद्म, चक्र आणि मोराची डिझाइन आहे. हे वस्र दिल्लीतील डिझाइनर मनीष त्रिपाठी यांनी तयार केले आहेत.