- Home
- India
- Exclusive : रामललांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सज्ज, श्री राम मंदिरातील सुंदर सजावटीचे पाहा खास PHOTOS
Exclusive : रामललांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सज्ज, श्री राम मंदिरातील सुंदर सजावटीचे पाहा खास PHOTOS
- FB
- TW
- Linkdin
अयोध्येतील श्री राम मंदिरामध्ये रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठेचा भव्यदिव्य सोहळा सोमवारी (22 जानेवारी 2024) पार पडणार आहे. रामलला यांचे दर्शन करण्यासाठी रामभक्त आतुर झाले आहेत.
रामलला यांच्या मूर्तीची सोमवारी शुभ मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.
अयोध्येतील श्री राम मंदिराची लांबी 380 फूट, रुंदी 250 फूट आणि उंची 161 फूट आहे.
मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी भाविकांनी पूर्व दिशेकडील 32 पायऱ्या चढव्या लागतील. येथे सिंहद्वारातून भाविकांना मंदिरामध्ये प्रवेश मिळेल.
अयोध्येतील श्री राम मंदिराचा पाया उभारण्यासाठी एकूण 2 हजार 587 ठिकाणांच्या मातीचा वापर करण्यात आला आहे.
राम मंदिरामध्ये नृत्य मंडप, रंग मंडप, सभा मंडप, कीर्तन मंडप आणि प्रार्थना मंडप अशा एकूण पाच मंडपांचा समावेश आहे.
श्री राम मंदिराची उभारणी पारंपरिक नागर शैलीमध्ये करण्यात आली आहे. मंदिर उभारताना लोखंड-सिमेंटचा वापर केलेला नाही.
राम मंदिरामध्ये एकूण 392 स्तंभ आणि 46 दरवाजे आहेत. यावर देवी-देवतांच्या मूर्ती कोरण्यात आल्या आहेत.
मंदिरातील गर्भगृहामध्ये सुवर्णद्वार बसवण्यात आले आहेत.
रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री राम मंदिरामध्ये सुंदर सजावट करण्यात आली आहे.
राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी देश-परदेशातील पाहुणे मंडळी उपस्थिती दर्शवणार आहेत.