सार

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा येत्या 22 जानेवारीला पार पडणार आहे. या दिवसी सात हजारांहून अधिक व्हीव्हीआयपी सोहळ्यासाठी उपस्थितीत लावणार असल्याचे सांगितले जात आहे.

Ram Mandir Ceremony : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. अशातच आता भाजपा पक्षाकडून संपूर्ण देशभरात रामाचा गजर करण्याचा विचार केला जात आहे. असे मानले जातेय की, भाजपाकडून (BJP) राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे लाइव्ह प्रक्षेपण (Live Telecast) करण्यात येईल. जेणेकरून संपूर्ण देशभरातील नागरिकांना हा भव्यदिव्य सोहळा पाहाता येईल.

भाजपाकडून खास प्लॅन
भाजपा पक्षाच्या सूत्रांनुसार, पक्षातील नेत्यांनी कार्यकर्त्यांना येत्या 22 जानेवारीसाठी राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमादिवशी मोठ्या स्क्रिनची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. जेणेकरून देशातील नागरिकांना सोहळ्याचे लाइव्ह प्रक्षेपण पाहाता येऊ शकते.

पक्षातील नेतेमंडळींचे म्हणणे आहे की, देशातील सर्व नागरिकांनी आपण त्या सोहळ्याचे भागीदार आहोत असे समजावे. यामुळेच लाइव्ह प्रक्षेपणासाठी भाजपाकडून तयारी केली जात आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी या कामासाठी स्वत:हून पुढे येऊन सहभागी व्हावे यासाठी पक्षाकडून प्रोत्साहन दिले जात आहे.

भाजपाकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन
भाजपाकडून येत्या 22 जानेवारीला वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यावेळी भंडारा ते ब्लँकेट वाटप केले जाणार आहे. याशिवाय गरिबांना फळ आणि मिठाईचे वाटप केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देभरातील प्रतिष्ठित मंडळी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमासाठी उपस्थितीत राहणार आहेत. कार्यक्रमासाठी चार हजार साधू-संतांना विशेष रूपात आमंत्रण देण्यात आले आहे.

आणखी वाचा : 

Ram Mandir Ceremony : राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी तैनात पोलिसांना स्मार्टफोन वापरण्यावर बंदी, या कारणास्तव घेतलाय निर्णय

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी VVIPना पाठवली जातेय खास निमंत्रण पत्रिका, जाणून घ्या खासियत

Ayodhya Ram Mandir : नागर शैलीत उभारण्यात आलेल्या राम मंदिराबद्दलच्या या काही खास गोष्टी माहितेयत का?