राम मंदिराला सोन्याचे दरवाजे? जाणून घ्या मंदिराबद्दलचे Unknown Facts
22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत रामललांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या दिवशी मंदिराच्या गाभाऱ्यात रामललांची मूर्ती स्थापन केली जाणार आहे.
अयोध्येत राम मंदिर उभारण्यात येत आहे. मंदिरासंदर्भात अशा काही गोष्टी आहेत ज्या फार कमी जणांना माहिती आहेत. मंदिराबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात अधिक....
राम मंदिर तीन मजली असणार असून याला 44 दरवाजे असणार आहेत. यापैकी तळमजल्यावरील 14 दरवाजे मंदिरात जाण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. या 14 दरवाज्यांना सोन्याचा मुलामा लावण्यात आला आहे.
राम मंदिराचे बहुतांश काम हे राजस्थानमधील बंसीपनपुर येथून आलेल्या दडगाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या दगडावरील नक्षीकला फार सुंदर दिसते.
राम मंदिराच्या गाभाऱ्याचा आकार अष्टकोनी आकारात तयार करण्यात आला आहे. मंदिराचा कळसही अष्टकोनी आकारात तयार करण्यात आलेला आहे.
राम मंदिर 2500 वर्षे सुरक्षित राहिल असे सांगण्यात आले आहे. यामुळे भूकंप किंवा नैसर्गिक आपत्ती आली तरीही मंदिराचे नुकसान होणार नाही.
भारतातील मंदिरांसाठी 16 शैलींचा वापर केला जातो. यामध्ये मंदिरांसाठी सर्वाधिक नागर, वेसर आणि द्रविड शैलीचे काम दिसते. राम मंदिराचे बांधकाम हे नागर शैलीत करण्यात आले आहे.
राम मंदिरात 329 नक्षीकाम केलेले खांब तयार करण्यात आले आहेत. याशिवाय मंदिराची सीमा भिंत 732 मीटर लांब असणार आहे.