Exclusive : "रामललांची मूर्ती साकारताना मी पाषाणाशी बोलायचो", वाचा अरुण योगीराज यांनी एशियानेट न्यूजला दिलेली विशेष मुलाखत

| Published : Feb 12 2024, 05:56 PM IST / Updated: Feb 12 2024, 06:08 PM IST

Exclusive Interview with Arun Yogiraj
Exclusive : "रामललांची मूर्ती साकारताना मी पाषाणाशी बोलायचो", वाचा अरुण योगीराज यांनी एशियानेट न्यूजला दिलेली विशेष मुलाखत
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा 22 जानेवारीला पार पडला. पण रामललांची मूर्ती तयार करणारे अरुण योगीराज आज घरोघरी पोहोचले आहेत. अरुण योगीराज यांनी एशियानेट न्यूजला विशेष मुलाखत दिली आहे.

Exclusive Interview with Arun Yogiraj : अयोध्येतील रामललांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी रामललांची बालरुपातील मूर्ती विधीवत पूजा-प्रार्थनेसह गर्भगृहात स्थापन करण्यात आली. खरंतर, रामललांची मूर्ती तयार करणारे अरुण योगीराज आज घरोघरी पोहोचले आहेत. अशातच एशियानेट न्यूजचे कार्यकारी अध्यक्ष राजेश कालरा यांनी अरुण योगीराज यांची विशेष मुलाखत घेतली. या विशेष मुलाखतीत अरुण योगीराज यांनी म्हटले की, “मला रामललांची मूर्ती साकारण्याचे भाग्य लाभले.” याशिवाय रामललांची मूर्ती साकारण्यासह आयुष्यातील शिल्पकाराची त्यांची भुमिका अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरही अरुण योगीराज यांनी विशेष मुलाखतीत गप्पा मारल्या. 

घराला 250 वर्षांचा शिल्पकलेचा वारसा
एशियानेट न्यूजचे कार्यकारी अध्यक्ष राजेश कारला यांच्यासोबतच्या मुलाखतीत अरुण यांनी घराला 250 वर्षांचा शिल्पकलेचा वारसा लाभल्याचे सांगितले. याशिवाय तीन रामललांच्या मूर्तींपैकी माझी रामललांची बालरुपातील मूर्ती निवडल्याने मी स्वत:ला खूप भाग्यवान मानतो असेही अरुण योगीराज यांनी म्हटले.

वडील आणि आजोबांनी पाच शतकांपेक्षा अधिक काळ जपलेले स्वप्न आणि त्यांची इच्छा होती, प्रभू श्रीरामांच्या एखाद्या प्रकल्पावर काम करायचे. रामललांची मूर्ती साकारण्याची संधी मिळाल्याने अरुण योगीराज स्वत:ला भाग्यवान समजतातच. पण खरंतर ही त्यांच्या कुटुंबाला दिलेला दैवी आशीर्वाद असल्याचे ही मानतात.

रामललांची मूर्ती तयार करताना आलेला अनुभव
रामललांची मूर्ती तयार करणे फार कठीण होते. सुरुवातीला काही अडचणींचा सामना करावा लागत होता. मूर्ती तयार करताना शिल्पकलेतील कौशल्य दाखवण्याचे मनाशी पक्के केले होते असे अरुण योगीराज यांनी म्हटले. मूर्ती तयार करण्याच्या अनुभवाबद्दल पुढे बोलताना अरुण योगीराज यांनी म्हटले की, रामललांची पाच वर्षांच्या बालरुपातील मूर्ती तयार करणे मुश्किल होते. खरंतर मूर्ती तयार करताना मनात केवळ रामललांबद्दलच्या प्रेमाची भावना ठेवून त्यावर काम केले.

मूर्ती तयार करण्यामध्ये इतका बुडालो होतो की, माझे रामललांसोबतचे सखोल नाते असल्याचे वाटत होते. याशिवाय मूर्ती तयार करताना सातत्याने रामललांचे बालस्वरुप लक्षात ठेण्यासह ज्या पाषाणावर शिल्पकला करतोय त्याच्याशी देखील मी बोलयचो असेही अरुण योगीराज यांनी सांगितले.

रामललांचे दर्शन घेणारा मी पहिलाच भक्त
मुलाखतीवेळी अरुण योगीराज यांनी रामललांचे दर्शन घेणारा मी स्वत:ला पहिला भक्त असल्याचे मानतो असे म्हटले. रामललांची मूर्ती तयार करण्याचे काम मी पूर्ण श्रद्धेने केले. याशिवाय देवाकडे प्रार्थनाही करायचो की, मला मूर्ती तयार करताना मार्गदर्शन देखील करा. यामुळेच रामललांची मूर्ती साकारणे शक्य झाल्याचे अरुण योगीराज यांनी म्हटले.

वयाच्या 11 व्या वर्षापासून सुरू केले शिल्पकलेचे काम
अरुण योगीराज यांनी त्यांच्या शिल्पकलेतील क्षेत्राबद्दल सांगताना म्हटले की, मी वयाच्या 11व्या वर्षापासून वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पकलेचे काम करण्यास सुरुवात केली होती. गेल्या दोन दशकांमध्ये सातत्याने मी शिल्पकलेत स्वत:ला झोकून दिले, माझी कला जोपासली आणि यामुळे माझी अध्यात्मिक ओढ अधिक वाढली गेली.

VIDEO : पाहा अरुण योगीराज यांनी एशियानेट न्यूजला दिलेली विशेष मुलाखत

आणखी वाचा : 

Ram Mandir Pran Pratishtha : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील सुंदर क्षणांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून व्हिडीओ शेअर (Watch Video)

Ram Mandir EXCLUSIVE : रामललांची मूर्ती साकारणारे अरुण योगीराज म्हणाले- ‘प्रभूंनी मला दर्शन दिले, हा सर्वात मोठा आनंद’

 

Read more Articles on