सार
Amazon Pay : Amazon Pay ला पेमेंट एग्रीगेटर म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे. त्यामुळे या कंपन्यांमधील स्पर्धा तीव्र झाली आहे.
Amazon Pay : Amazon Pay ला पेमेंट एग्रीगेटर म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे. त्यामुळे या कंपन्यांमधील स्पर्धा तीव्र झाली आहे. अमेझॉन पे (Amazon Pay) या ई कॉमर्स क्षेत्रातील ई कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पेमेंट अग्रीगेटर हा परवाना मिळाला आहे. 20 फेब्रुवारी रोजी या पेमेंट अँपला पेमेंट ऍग्रीगेटर म्हणून काम करण्यास मान्यता दिली, त्यामुळे ते त्याच्या प्लॅटफॉर्मद्वारे ई-कॉमर्स व्यवहार सुलभ करतील.
यावेळी बोलताना अमेझॉन पेचे प्रवक्ते यांनी बोलताना सांगितले की, ““आम्ही जीवन सुलभ करण्यासाठी तसेच व्यापारी आणि ग्राहकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहोत. हा (परवाना) आम्हाला आमचे वितरण चॅनेल अधिक मजबूत करण्यास आणि संपूर्ण भारतातील आमच्या व्यापारी आणि ग्राहकांसाठी त्यांना सुरक्षित, सोयीस्कर आणि फायद्याचे डिजिटल पेमेंट अनुभव प्रदान करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय प्रदान करण्यास अनुमती देत आहे.”
कंपनीकडे आधीपासूनच प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPI) परवाना असून त्यामुळे ॲमेझॉन पे बॅलन्स: मनी सारख्या वॉलेट सेवा दिल्या जातात. 2024 च्या सुरुवातीपासून हा परवाना 10 कंपन्यांना देण्यात आला आहे. या कंपन्यांमध्ये Zomato, Juspay, Decentro, Mswipe, Zoho, Stripe आणि इतर सारख्या प्रमुख नावांचा समावेश आहे.
आणखी वाचा -
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची SIT चौकशी होणार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आदेश
Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या अडचणींमध्ये वाढ, बीडमध्ये पोलिसांकडून FIR दाखल
"माझ्या कामाची पद्धत पंतप्रधानांशी मिळती जुळती..." अजित पवारांनी खुले पत्र जारी करून सांगितले का सोडली काकांची साथ