Ghatkopar Hoarding Incident : घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील आरोपीला राजस्थानात पकडले, बचावकार्य संपल्यानंतर पोलिसांकडून कसून चौकशी सुरु

| Published : May 17 2024, 12:55 PM IST

bhavesh bhinde
Ghatkopar Hoarding Incident : घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील आरोपीला राजस्थानात पकडले, बचावकार्य संपल्यानंतर पोलिसांकडून कसून चौकशी सुरु
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

मुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला असून 75 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून बचाव कार्य थांबवण्यात आले आहे. पोलीस होर्डिंग कंपनीच्या मालकाची कसून चौकशी करत आहेत. 

मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग घटनेत मोठी जीवितहानी आणि आर्थिक हानी झाली आहे. येथे झालेल्या दुर्घटनेची बचाव मोहीम ही दोन दिवसांपेक्षा जास्त काळ चालली होती. या दृघटनेत वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून 70 पेक्षा जास्त दुर्घटनाग्रस्त वाहने ढिगाऱ्याखालून काढण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई गुन्हे शाखेने होर्डिंगचा मालक भावेश भिंडे याला राजस्थानमधून अटक केली आहे. 

उदयपूरमध्ये लपून बसला होता भावेश भिंडे - 
घाटकोपर येथे झालेल्या दुर्घटनेतील होर्डिंगचा मालक भावेश भिंडे हा राजस्थानमधील उदयपूरमध्ये लपून बसला होता. त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे. मुंबईत सोमवारी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. घाटकोपर येथे असणाऱ्या छेडा नगर भागातील पेट्रोल पंपावर होर्डिंग पडली आणि त्यामध्ये अपघात झाला. यावेळी पडलेल्या होर्डिंगमुळे अनेक वाहने आणि लोक त्याच्याखाली सापडली. या दुर्घटनेमध्ये 16 जणांचा मृत्यू झाला असून 75 जण जखमी झालेत. 

बचाव मोहीम राबवण्यात आली अशी - 
घाटकोपर येथील दुर्घटनेच्या स्थळी चाललेली बचाव मोहीम थांबवण्यात आली आहे. पेट्रोल पंपावरील परिस्थितीचा आढावा घेऊनच बचाव मोहीम थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पथकाने गाड्यांमध्ये अडकलेले मृतदेह काढण्यात आले. येथे बचाव मोहीम चालू असताना एनडीआरएफच्या जवानांनी जलद गतीने कार्य करून गाड्या बाजूला करण्याचे काम केलं. 

नुकसान झालेली वाहने पोलिसांच्या ताब्यात - 
बीएमसीच्या अधिकाऱ्याने बचाव मोहिमेच्याबाबत बोलताना सांगितले आहे की, "अपघातात 30 दुचाकी, 31 चारचाकी, आठ ऑटोरिक्षा आणि दोन अवजड वाहने जप्त करून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. एनडीआरएफच्या तुकडीने बचावकार्य वेगाने राबवले असून हे ऑपरेशन संपल्यानंतर त्यांना परत पाठवण्यात आले आहे. ऑपरेशन संपल्याची घोषणा बीएमसीचे आयुक्त भूषण गगराणी यांनी केली आहे. पेट्रोल पंपाबाबत मात्र अजूनही खबरदारी घेतली जात असून येथे तीन अग्निशमन दल आणि वरिष्ठ अधिकारी अजूनही तळ ठोकून आहेत. 
आणखी वाचा : 
चार धाम मंदिराच्या परिसरात व्हिडीओ आणि रिल्स शूट करण्यावर बंदी, 31 मार्चपर्यंत VIP दर्शनही नाही
Swati Maliwal Case : स्वाती मालिवाल यांच्यावर रात्री उशिरापर्यंत वैद्यकीच चाचणी, वाचा प्रकरणातील आतापर्यंतची टाइमलाइन