आम आदमी पक्षाने अमेरिका, कॅनडा आणि अरब देशांकडून कोट्यावधी रुपयांचा बेकायदेशीर मिळवला निधी. ईडीने गृह मंत्रालयाला केला अहवाल सादर

| Published : May 20 2024, 04:56 PM IST

Arvind Kejriwal
आम आदमी पक्षाने अमेरिका, कॅनडा आणि अरब देशांकडून कोट्यावधी रुपयांचा बेकायदेशीर मिळवला निधी. ईडीने गृह मंत्रालयाला केला अहवाल सादर
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

आम आदमी पक्षाने अवैधरित्या पैसा मिळवला असून याबाबतचा अहवाल ईडीने गृह मंत्रालयाला सादर केला आहे. अमेरिका, कॅनडा आणि अरब देशांमधून हा निधी मिळवला आहे. 

आम आदमी पक्षाच्या अडचणी थांबायचे नाव घेताना दिसत नाहीत. दिल्लीतील दारू घोटाळ्यात अडकल्यानंतर आता स्वाती मालिवाल यांच्या मारहाण प्रकरणावरून आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांना अटक करण्यात आली आहे. ईडीने गृहमंत्रालयाला दिलेल्या माहितीमध्ये आपने विदेशी निधी मिळवला असल्याचे म्हटले आहे. 

आम आदमी पक्षाला किती मिळाला निधी? -
आम आदमी पक्षाला 2014-22 ला 7.08 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. हा विदेशी निधी मिळून एफसीआरए, आरपीए आणि आयपीसीचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा निधी मिळवण्यासाठी ईडीने आपल्या अहवालात विदेशी देणगीदारांची ओळख आणि राष्ट्रीयत्व लपविण्यासारखे तसेच इतर अनेक तथ्यांवर आरोप केले आहे. 

ईडीने काय दिली माहिती - 
ईडीने सांगितले आहे की, आम आदमी पक्षाला अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कुवेत, ओमान आणि इतर देशांमधून निधी मिळाला आहे. निधी मिळवत असताना समान पासपोर्ट क्रमांक, क्रेडिट कार्ड, ईमेल आयडी आणि मोबाईल वेगवगेळ्या देणगीदारांकडून निधी देण्यासाठी वापर करण्यात आला आहे. 

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार अटकेत - 
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर स्वाती मालिवाल यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी मोबाईल फॉरमॅट केला असून त्यामधील माहिती नष्ट केली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानातील कॅमेऱ्यांमधील डेटा डिलीट केला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
आणखी वाचा - 
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीव्र शोक केला व्यक्त
कोण आहेत ऋषी सुनक? का आलेत चर्चेत?