सार

ऋषी सुनक कोण आहेत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल आणि ते सध्या का चर्चेत आले आहेत. या दोन्ही प्रश्वांची उत्तर तुम्हाला हा लेख वाजून मिळणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया ऋषी सुनक यांच्या विषयी सविस्तर माहिती.

ऋषी सुनक कोण आहेत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल आणि ते सध्या का चर्चेत आले आहेत. या दोन्ही प्रश्वांची उत्तर तुम्हाला हा लेख वाजून मिळणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया ऋषी सुनक यांच्या विषयी सविस्तर माहिती.

पंजाबमधून असे पोहोचले इंग्लंडमध्ये

ऋषी सुनक हे मूळचे पंजाबच्या गुजरांवाला येथील रहिवाशी आहेत. देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीच सुनक यांचे आजी आणि आजोबा भारतातून पूर्व आफ्रिकेत स्थलांतरित झाले होते. सुनक यांचे आजी-आजोबा आफ्रिकेत जाण्यापूर्वी गुजरांवाला हा भारताचा भाग होता. परंतु फाळणीनंतर गुजरांवाला पाकिस्तानात गेला. दरम्यान सुनक यांचे आजी-आजोबा काही काळानंतर आफ्रिकेतून इंग्लंडला गेले.

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्तींचे जावई

ऋषी सुनक यांचा जन्म 12 मे 1980 रोजी इंग्लंडमधील साउथम्प्टन येथे झाला. ऋषी यांच्या आईचे नाव उषा आणि वडिलांचे नाव यशवीर सुनक आहे. यशवीर सुनक हे व्यवसायाने डॉक्टर असून आई उषा सुनक या फार्मासिस्ट आहेत. ऋषी सुनक यांना दोन मुली आणि पत्नी असा परिवार आहे. त्यांच्या पत्नीचे नाव अक्षता मूर्ती आहे. अक्षता या भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि आयटी कंपनी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी आहे. अनुष्का आणि कृष्णा अशी ऋषी सुनक याच्या दोन्ही मुलींची नावं आहेत.

अक्षता सुनक याची भेट आणि विवाह

ऋषी सुनक यांचे प्राथमिक शिक्षण इंग्लंडमध्ये झाले. त्यांनी पुढील शिक्षण विंचेस्टर कॉलेज आणि ऑक्सफर्डमधून पूर्ण केले. सुनक यांनी 2006 मध्ये एमबीए करण्यासाठी स्टॅनफोर्ड विद्यापीठ गाठले आणि येथेच त्यांना आयुष्याची जोडीदार भेटली. येथे त्यांची ओळख अक्षता मूर्ती यांच्याशी झाली. अक्षताही तेथे एमबीए करत होत्या. स्टॅनफोर्डमध्येच दोघांमधील प्रेम फुलले. 2009 मध्ये ऋषी यांनी अक्षतासोबत विवाह केला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ऋषी यांना गोल्डमन सेक्समध्ये नोकरी मिळाली. परंतु 2009 मध्ये त्यांनी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. ऋषीच्या पत्नीचंही इंग्लंडमध्ये मोठं नाव आहे. अक्षता यांचा इंग्लंडमध्ये स्वतःचा फॅशन ब्रँड आहे. अक्षता या सध्या इंग्लंडमधील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहे.

सद्या ऋषी सुनक का आलेत चर्चेत?

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाली असून संडे टाइम्सने श्रीमंतांची नवी यादीमधील आकडेवारीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. या श्रीमंत यादीत ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि पत्नी अक्षता मूर्ती यांच्या संपत्तीत गेल्या वर्षी १२२ दशलक्ष पौंड (सुमारे १२८७ कोटी रुपये) वाढ झाली असून नवीन यादीमध्ये, जोडप्याची अंदाजे निव्वळ संपत्ती २०२४ मध्ये ५२९ दशलक्ष पौंडवरून ६५१ दशलक्ष पौंड (६,८६७ कोटी रुपये) झाली आहे. संपत्तीमध्ये झालेल्या भरमसाठ वाढीमुळे सुनक आता ब्रिटनचे राजा चार्ल्स III यांच्यापेक्षाही अधिक श्रीमंत झाले आहेत. होय, ब्रिटनच्या सर्वात श्रीमंत लोकांच्या संडे टाइम्सच्या वार्षिक यादीनुसार राजा चार्ल्स III गेल्या वर्षी सुनक कुटुंबापेक्षा श्रीमंत होते, पण गेल्या वर्षी राजाच्या संपत्तीत १० दशलक्ष पौड ते ६१० दशलक्ष पौंड एवढी वाढ झाली.